Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

Turkey-Syria Earthquake Video : भूकंपात (Earthquake)आतापर्यंत 3549 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 8000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव मोहिम सुरु असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 7, 2023, 08:15 PM IST
Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

Turkey-Syria Earthquake Video : तुर्कस्तान आणि सीरीयामध्ये (Turkey-Syria Earthquake) एका मागून एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भूकंपात पत्यासारख्या बिल्डिंगी कोसळल्या आहेत, तर अनेक मॉल, सिनेमे जमीनदोस्त झाले आहेत. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या अडकलेल्या लोकांना युद्ध पातळीवर वाचवण्याचे कार्य सुरु आहे. ही बचाव मोहिम (Resque) सुरु असताना एका नवजात बालकाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

 तुर्कस्तान आणि सीरीयामध्ये भूकंपाचे (Turkey-Syria Earthquake) अनेक धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यात होत्याचं नव्हते झाले आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरीकांचे प्राण वाचवण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. आतापर्यंत अनेक लोकांना वाचवण्यात यश आले आहे, तर अनेक लोकांचा या भूकंपात मृत्यू देखील झाला आहे. 

व्हिडिओत काय?

भूकंपामुळे (Earthquake) ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरीकांना युद्ध पातळीवर वाचवण्याचे काम सुरु आहे. ही बचाव मोहीम राबवत असतानाच ढिगाऱ्याखाली बचाव पथकाला एक नवजात बाळ सापडले आहे. या नवजात बालकाला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. या बचाव मोहिमेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

हा व्हिडिओ सीरियन आणि कुर्दिश विषयावरील पत्रकार होशांग हसन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने ट्विटमध्ये लिहले की, आजच्या भूकंपानंतर एका महिलेला ढिगाऱ्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा महिलेने मुलाला जन्म दिला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता बचाव पथकातला एक व्यक्ती एका नवजात बालकाला सुखरूप बाहेर घेऊन जात आहे. त्यानंतर त्याला सुखरूप ठिकाणी नेण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार सीरीयातील आफरीनमध्ये हे नवजात अर्भक सापडले आहे. तर मुलाला जन्म दिल्यानंतर त्याच्या आईच्या ढिगाऱ्याखाली मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 464 लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

या भूकंपात (Earthquake)आतापर्यंत 3549 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 8000 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव मोहिम सुरु असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.