Twin Sister: खाणे-कपड्यापासून बॉयफ्रेंडपर्यंत सर्व काही शेअर करतात या बहिणी, आता समोर आली ही समस्या

तुम्ही 'दो जिस्म और एक जान' ही म्हण ऐकली असेल. पण ऑस्ट्रेलियामध्ये या म्हणीप्रमाणे सत्यात घडले आहे.  

Updated: Apr 8, 2021, 11:32 AM IST
Twin Sister: खाणे-कपड्यापासून बॉयफ्रेंडपर्यंत सर्व काही शेअर करतात या बहिणी, आता समोर आली ही समस्या
इंस्टाग्राम @annalucydecinque

कॅनबेरा : तुम्ही 'दो जिस्म और एक जान' ही म्हण ऐकली असेल. पण ऑस्ट्रेलियामध्ये या म्हणीप्रमाणे सत्यात घडले आहे. येथे दोन जुळ्या बहिणी आहेत, त्या सर्व काही एकत्र काम करतात. दोघी एकत्र खातात, एकत्रच आंघोळ करतात तसेच एकाच बेडवर झोपतात. त्यांचा बॉयफ्रेंडसुद्धा एकच आहे. अजब म्हणजे या दोघीनाही एकाच बॉयफ्रेंडपासून प्रेग्नंट  (Twin Sister Wants To Get Pregnant With Same Boyfriend) व्हायचे आहे.

काय आहे जुळ्या बहिणींचा जीवनाचा मंत्र  ?

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या दोन बहिणींची नावे लूसी डिसींक आणि एना अशी आहेत. एकत्र काम करणे आणि सर्व कामे एकत्र करणे हा त्यांच्या जीवनाचा मंत्र आहे.  लूसी डिसींक आणि एना अलीकडेच एका रियॅलिटी टीव्ही शोमध्ये एकत्र दिसल्या. असा दावा केला जात आहे की, या दोघी जगातील सर्वात प्रेमळ जुळ्या बहिणी आहेत. कारण त्या एकत्रच राहतात आणि सर्व काम एकत्रच करतात.

विशेष म्हणजे, लूसी डिसींक आणि एना एक सारखे कपडे घालतात. त्या एकत्र वर्कआउट करतात. या जुळ्या बहिणींपैकी (Twin Sister) एक ओळखणे फार कठीण आहे. दोघीही एकसारख्या दिसतात.

दोन्ही बहिणींचा एकच प्रियकर आहे

लूसी डिसींक आणि एना यांचा एकच प्रियकर आहेत. दोन्ही बहिणी आपल्या प्रिय मित्रांसह एकाच घरात राहतात. या दोघांनी आपल्या प्रियकराला सांगितले आहे की, त्यांना एकाचवेळी आपल्या मुलाची आई व्हायचे आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा कायदा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे.

हा कायदा विवाहात अडथळा ठरत आहे

ऑस्ट्रेलिया मॅरेज अ‍ॅक्ट 1961 नुसार (Australia Marriage Act 1961) एखाद्या व्यक्तीचे एकाच वेळी दोन विवाह करु शकत नाहीत. रिअल्टी टीव्ही शोमध्ये दोन्ही बहिणी त्याबद्दल खूपच भावनाप्रधान झाल्या होत्या. कारण त्यांना बरेच दिवसांपासून लग्न करायचे आहे.

लूसी डिसींक आणि एना यांची 2012 मध्ये  प्रियकर बेनशी ओळख झाली. 2012 मध्ये भेटल्यानंतर ते एकत्रच राहत आहेत. ल्यूसीने सांगितले की आमचा बॉयफ्रेंड एकच आहे. तेव्हापासून आम्ही नेहमी एकत्र राहत आहोत आणि आमच्या नात्यात कोणताही दुरावा नाही की संशय नाही. इतर काही गोष्टींना यात स्थान नाही.