Forbes Rich List: Elon Musk यांना मोठा धक्का; सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला, आता 'या' व्यक्तीने मारली बाजी!

Most Richest Person:  सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 73 वर्षींचे अब्जाधीश उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.

BGR | Updated: Dec 9, 2022, 04:37 PM IST
Forbes Rich List: Elon Musk यांना मोठा धक्का; सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला, आता 'या' व्यक्तीने मारली बाजी! title=
Forbes Rich List Elon Musk

Elon Musk: स्पेस एक्स (spacex) आणि टेस्ला कारचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी 44 अरब डॉलर खर्च करून ट्विटरचा (Twitter) ताबा घेतला. त्यानंतर ट्विटरमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं पहायला मिळतंय. एलॉन मस्क यांच्या अल्टिमेटमनंतर शेकडो कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली. राजीनाम्यानंतर (Resign) कंपनीने अनेक कार्यालये काही दिवस बंद ठेवली होती. त्यानंतर ट्विटरने काही कर्मचाऱ्यांना नारळ देखील दिला होता. त्यानंतर आता एलॉन मस्क यांना धक्का बसल्याचं पहायला मिळतंय.

गेल्या काही महिन्यांपासून एलॉन मस्क यांचं नाव जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीच्या सर्वोच्च (Most Richest Person's Lists) स्थानी होतं. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मानाचा ताज मस्क यांच्या डोक्यावर होता. मात्र, आता एलॉन मस्क (Most Richest Person Elon Musk) यांना धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 73 वर्षींचे अब्जाधीश उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.

अर्नाल्ट आणि एलॉन मस्क यांच्यात 1.2 अब्ज डॉलर्सचे अंतर आहे. फोर्ब्सच्या रियल टाईम बिलिनियर्स इंडेक्समध्ये (Forbes Real Time Billionaires Index) एलवीएमएच (LVMH) मालक आणि उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट यांचं नाव आहे. बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती 186.2 बिलियन डॉलर झाली आहे, तर एलॉन मस्कची संपत्ती 185 बिलियन डॉलर आहे. त्यामुळे दोन्ही दिग्गजांमध्ये चुरसीची लढत पहायला मिळत आहे.

आणखी वाचा - मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ

दरम्यान, ब्‍लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्‍सच्या (Bloomberg Billionaires Index) यादीनुसार एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अद्याप आपलं स्थान कायम ठेवलंय, असं दिसतंय. फक्त  1.2 अब्ज डॉलर्सची तफावत असल्याने संपत्ती आणि गुंतवणुकीच्या परिमाणाने एलॉन मस्क यांची बाजू अजूनही ताकदवर असल्याचं पहायला मिळतंय.