Video Vodka Lovers! प्रत्येकाच्या किचनमधील 'या' पदार्थाने बनवला जातो वोडका

Vodka : पार्टीची जान 'वोडका' हे महिलांमध्ये सर्वाधिक पॉप्यूलर ड्रिंक आहे. जसं द्राक्षापासून वाईन बनवतात. मग वोडका कशापासून बनवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Dec 9, 2022, 03:29 PM IST
Video Vodka Lovers! प्रत्येकाच्या किचनमधील 'या' पदार्थाने बनवला जातो वोडका title=
video Vodka made with ingredients in everyone kitchen Quinoa grain Potato Corn nmp

Vodka Making Video : मद्यपान करणारे असो किंवा न करणारे पण तुम्हाला दारूबद्दलच्या काही गोष्टी माहिती आहेत का. जसं द्राक्षापासून वाईन बनते, गव्हापासून बियर तर लोकप्रिय आणि पार्टीची जान वोडका हा कश्यापासून बनतो माहिती आहे का? बियर, वोडका, रम, व्हिस्की, ब्रँडी, वाईन या सगळ्यांमध्ये चवीचा नाही तर यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा फरक आहे. वोडका हे जगभरात पॉप्यूलर ड्रिंक असून ते रशियामध्ये सर्वाधिक प्यायलं जातं. 

प्रत्येक घरामध्ये असणारा पदार्थ अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ त्यापासून हा वोडका तयार होतो. (video Vodka made with ingredients in everyone kitchen Quinoa grain Potato Corn)

या पदार्थांपासून तयार होतो वोडका

 जर तुम्ही वोडकाचे शौकीन असलात तर तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या पदार्थांपासून तो बनतो. बटाटे, कॉर्न, सफरचंद आणि अगदी राईपासून वोडका तयार केला जातो.

क्विनोआ (Quinoa)

आजकाल क्विनोआपासून वोडका बनवली जाते. ही वोडकासाठी नवीन पदार्थ असला तरी हा पदार्थ 5 हजार वर्षे जुना पदार्थ आहे. वोडका हा यूएस बेस्ड डिस्टिलरने 2019 मध्ये क्विनोआ वोडका लॉन्च केला होता. 

धान्य (grain)

धान्य आणि राईपासून वोडका बनवला जातो. मक्का आणि बटाटापेक्षा या वोडका खूप छान चव असते आणि धान्यापासून सहज बनवली जाते. 

 

हेसुद्धा वाचा - Video Alcohol : व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांच्यामधील अंतर माहिती आहे का?

 

बटाटा (Potato)

बटाटा आपल्याला सहज उपलब्ध होतो. त्यामुळे सगळ्यात पहिले बटाट्यापासून वोडका बनवण्यास सुरुवात झाली. आज आम्ही तुम्हाला बटाट्यापासून वोडका कसा तयार करतात याचा एक व्हिडिओ दाखवणार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मका (Corn)

मक्यापासून तयार करण्यात येणारा वोडका हे खूप गोड असतं. सफरचंद, मध आणि मॅपल यापासूनही बनवण्यात येतो.