युक्रेनमधील सर्वात सुंदर महिला देखील युद्धासाठी मैदानात उतरली, पण सौंदर्य पाहून...

ही आहे युक्रेनची सर्वांत सुंदर महिला....

Updated: Feb 27, 2022, 10:29 PM IST
  युक्रेनमधील सर्वात सुंदर महिला देखील युद्धासाठी मैदानात उतरली, पण सौंदर्य पाहून... title=

मुंबई : ही आहे युक्रेनची सर्वांत सुंदर महिला....अनास्तासिया लेना... 2015 मध्ये मिस ग्रँड युक्रेनचा किताब पटकावणारी अनास्तासिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बोल्ड ब्युटीक्वीन अनास्तासियानं देशासाठी बंदूक हाती घेतली आहे.

आपल्या घराचं रक्षण करण्याची वेळ आली आहे, असं सांगत तिनं युक्रेनच्या सैन्यात सहभागी होत रशियाला खुलं आव्हान दिलं आहे.

अनास्तासियानं हातात बंदूक घेतलेला फोटो सोशल मीडियात शेअर केलाय.'आमच्या भूमीवर कब्जा करण्याच्या इराद्यानं घुसखोरी कराल तर जीवानिशी जाल', असा इशारा तिनं आपल्या पोस्टमधून दिला आहे.

इतकंच नाही तर ज्याप्रमाणे युक्रेनचं सैन्य लढतंय, ते पाहता नाटोनं युक्रेनमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करायला हवा असा टोलाही तिनं लगावला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत युक्रेनी सैन्याला मदत करा' असं आवाहन या लेडी डॉननं केलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

कोण आहे ही सुंदर महिला?

अनास्तासिया याआधी तुर्कस्तानात मॉडेल होती, शिवाय तिनं पब्लिक रिलेशन मॅनेजर म्हणून कामही केलंय. तसं पाहिलं तर युद्धाचा आणि तिचा दूरदूरपर्यंत संबंध नाही.

मात्रआपल्या देशवासियांचं आणि सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी तिनं उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्याप्रमाणंच युक्रेनमधल्या इतरही महिलांनी आता शस्त्र हाती घेण्यास सुरूवात केली आहे. रशियाच्या खासदार केईरा रुदीक यांनीही असाच एक बंदूक घेतलेला फोटो शेअर

केलाय. मायभूमीच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेण्याची वेळ आलीय असा संदेश युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. त्यात युक्रेनची नारीशक्ती आघाडीवर आहे असं म्हणायला हरकत नाही.