एक पाय गमावलेल्या सैनिकाचं प्रपोजल गर्लफ्रेंडनं स्वीकारलं... ; Video सेव्ह करुन ठेवावा इतका सुंदर

असं म्हणतात प्रेमानं जग जिंकता येतं... मग एखाद्या व्यक्तीचं मन काय घेऊन बसलात. प्रेमात पडलेल्या कोणाही व्यक्तीला विचारून पाहा, या एका संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात असणाऱ्या सर्व भावना क्षणात उफाळून येतील. कारण प्रेम आहेच तसं. तुम्ही जेव्हा त्याचा अनुभव घेता तेव्हा जणू काही सारं जग थांबलंय आणि तुमच्याच आयुष्यात काहीतरी सुरेख घडत आहे असं तुम्हाला वाटेल. अतिशयोक्ती वाटेल, पण हेच खरं आहे. (Ukrainian defender proposes his girlfriend emotional Video goes viral)

Updated: Oct 3, 2022, 01:47 PM IST
एक पाय गमावलेल्या सैनिकाचं प्रपोजल गर्लफ्रेंडनं स्वीकारलं... ; Video सेव्ह करुन ठेवावा इतका सुंदर  title=
Ukrainian defender proposes his girlfriend emotional Video goes viral

Viral Video : असं म्हणतात प्रेमानं जग जिंकता येतं... मग एखाद्या व्यक्तीचं मन काय घेऊन बसलात. प्रेमात पडलेल्या कोणाही व्यक्तीला विचारून पाहा, या एका संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात असणाऱ्या सर्व भावना क्षणात उफाळून येतील. कारण प्रेम आहेच तसं. तुम्ही जेव्हा त्याचा अनुभव घेता तेव्हा जणू काही सारं जग थांबलंय आणि तुमच्याच आयुष्यात काहीतरी सुरेख घडत आहे असं तुम्हाला वाटेल. अतिशयोक्ती वाटेल, पण हेच खरं आहे. (Ukrainian defender proposes his girlfriend emotional Video goes viral)

(Love) प्रेम नि:स्वार्थ असतं. जेव्हा या नात्यात व्यवहार येतात तेव्हा प्रेम कुठेच उरलेलं नसतं. त्यामुळं भरभरून प्रेम करा, अमर्याद प्रेम करा असं अनेक प्रेमवीर सांगून गेले आहेत. प्रेमवीर आणि त्यांच्या प्रेमापोटी असणाऱ्या भावनांविषयी बोलण्याचं एक कारण आहे. हे कारण म्हणजे व्हायरल होणारा एक Video.

हा व्हिडीओ आहे, एका युक्रेनियन सैनिकाचा (Ukraine Soldier). गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरु असणाऱ्या युद्धाला पूर्णविराम लागलेला नाही. असंख्य कुटुंब उध्वस्त झाली, शहरं निर्मनुष्य झाली, आर्थिक नुकसान झालं. 

एकिकडे हे सर्व सुरु असतानाच दुसरीकडे प्रेमाची भावना मात्र कुठेच दुर्लक्षित झाली नाही. परिस्थिती बिकट होती, पण प्रेमाच्या बळावर अनेकांनीच त्या परिस्थितीचाही सामना केला. यापैकीच एक युक्रेनचा सैनिक. 

स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठीसुद्धा ज्याला कोणाच्या आधाराची गरज असते त्या सैनिकानं खास मित्रमंडळींच्या उपस्थितीत प्रेयसीला प्रपोज केलं आणि हे क्षण पाहताना तिथं असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनाही अश्रू रोखणं कठीण झालं. 

ज्याच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या त्या व्यक्तीनं आपल्यासमोर येत लग्नाची मागणी घालणं म्हणजे जणू सहजीवनाच्या आयुष्याची नांदी. या सैनिकासोबतही असंच झालं. आयुष्यभरासाठी साथ देशील का... असं म्हणताना या सैनिकानं प्रेयसीला प्रपोज केलं आणि तिचा होकार त्याला सर्वकाही देऊन गेला. आहे की नाही हा Video सेव्ह करुन ठेवावा असा?