Donald Trump यांना घटस्फोट दिल्यास मेलानियांना settlement म्हणून मिळणार 'इतकी' रक्कम

रकमेचा आकडा पाहून म्हणाल... 

Updated: Nov 12, 2020, 10:18 AM IST
Donald Trump यांना घटस्फोट दिल्यास मेलानियांना settlement म्हणून मिळणार 'इतकी' रक्कम
संग्रहित छायाचित्र

वॉशिंग्टन : US presidential Election 2020 अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांना जो बायडन यांचाकडून पराभव स्वीकारावा लागला. पण, यातही ट्रम्प यांनी सरळमार्गी त्यांच्या पराभवाचा स्वीकार मात्र केला नाही. न्यायालय ते अगदी हिंसाचार अशी एकंदर किनार या प्रकणाला मिळाल्याचं पाहायला मिळालं. 

एकिकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापासून दूर जाणाऱ्या ट्रम्प यांच्या खासगी जीवनातही सध्या वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. हे वादळ आहे पत्नी Melania मेलानियापासून वेगळं होण्याचं. डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी त्यांना घटस्फोट देणार असल्याच्या बऱ्याच चर्चांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधी होती. ट्रम्प आणि मेलानिया यांना एक अपत्य Barron Trump आहे. 

कायदे तज्ज्ञांच्या मते मेलानिया यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोच दिल्यास त्यांना घटस्फोटासाठीची settlement म्हणून $68 million इतकी मोठी रक्कम मिळू शकते. 

 

व्हाईट हाऊसशी संलग्न अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ट्रम्प कधी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडतात आणि कधी त्यांना घटस्फोट देते याची मेलानिया प्रतीक्षा करत आहेत. ते कार्यालयीन कामकाजात असतानाच मेलानिया यांनी हा निर्णय़ घेतला तर, त्यावर ट्रम्प शांत राहणाऱ्यांपैकी नाही असाही मोठा खुलासा करण्यात आला आहे. तेव्हा आता या नात्यामध्ये नेमकं कोणतं वळण येतात याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे