आणखी एक धक्का; व्हाईट हाऊसमागोमाग ट्रम्प मेलेनियालाही गमावणार?

अध्यक्षपद गेल्यानंतर ट्रम्प यांचे फिरले दिवस 

Updated: Nov 9, 2020, 10:38 AM IST
 आणखी एक धक्का; व्हाईट हाऊसमागोमाग ट्रम्प मेलेनियालाही गमावणार?  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत नुकतीच पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांना बायडन यांचाकडून पराभव स्विकारावा लागला. मात्र ट्रम्प यांनी हा पराभव स्विकारलेला नाही. बायडन यांच्या विजयानंतर पाच तासांनी ट्रम्प यांनी ट्विट करून निवडणूकीत काही तरी गोंधळ झाल्याचा आरोप केला. 

ट्रम्प यांनी आपण निवडणुकीत जिंकले असून ७ करोड १० लाख मतदान मिळाल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान डेली मेलने ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांच्या माजी सहकर्मचाऱ्याच्या हवाल्यानुसार म्हटलंय की, निवडणूक हरल्यानंतर मेलानिया ट्रम्प यांचा साथ सोडणार आहे. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मेलानियाची माजी सहकारी स्टेफनी वोल्कॉफने दावा केला आहे की, मेलानिया लग्नापासूनच ट्रम्प यांच्याशी घटस्फोबद्दल बोलत होती. मुलगा बॅरनसोबतच ट्रम्प यांच्या संपत्तीचा बरोबर हिस्सा मागत आहेत. वोल्कॉफने हा पण आरोप लावला आहे की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी ट्रम्प आणि मेलानिया यांचे वेगवेगळे बेडरुम आहेत. या दोघांमध्ये ट्रंजेक्शनल करार झाला आहे.

'जर ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना घटस्फोटाचा निर्णय घेतल्यास ते आपल्या अधिकारांचा गैरउपयोग करुन आपल्याला त्रास देण्याची कारणं शोधतील असं वाटत असल्याने मेलानिया यांनी या क्षणाची वाट पाहिली,' असाही दावा या वृत्तात करण्यात आलाय. व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या ओमरोसा मॅनिगॉल्ट न्यूमेन नावाच्या महिलेने हा दावा केल्याचं डेली मेलने म्हटलंय. न्यूमेन व्हाईट हाऊसच्या सार्वजनिक संपर्क कार्यालयाच्या माजी संपर्क संचालक होत्या. मॅनिगॉल्ट न्यूमेन यांनी डिसेंबर २०१७ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. .