एलॉन मस्क यांच्या आठ डॉलरच्या नादात कंपनीचे 15 बिलियन डॉलर्सचे नुकसान, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

एलॉन मस्क यांच्या निर्णयाचा कंपनीला मोठा फटका

Updated: Nov 12, 2022, 03:40 PM IST
 एलॉन मस्क यांच्या आठ डॉलरच्या नादात कंपनीचे 15 बिलियन डॉलर्सचे नुकसान, जाणून घ्या काय आहे प्रकरण... title=

टेस्ला (tesla) प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) सुत्रे हातात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांच्या धाडसी निर्णयांची सध्या जोरदार चर्चा सुरुय. एलॉन यांच्या निर्णयांनी ट्विटर युजर्सची चिंता वाढली आहे. मस्क सातत्याने त्यांच्या निर्णयात बदल करत आहेत.  बड्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यापासून ट्विटरवर ब्लु टीक (blue tick) असलेल्या युजर्ससाठी पैसे आकारण्यापर्यंत अनेक निर्णय मस्क यांनी घेतले आहेत. मात्र पैसे भरून अनेक फेक अकाउंट व्हेरीफाय केली जात असल्याने मस्क यांनी हा निर्णय मागे घेतला. पण त्याआधीच एलॉन मस्क यांच्या निर्णयामुळे एका कंपनीला तब्बल 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. (US Pharma Company Eli Lilly Lost 15 Billions Dollar After Twitter Blue account post fake tweet)

एलॉन मस्क हे ट्विटरवर ब्लू टिक व्हेरिफिकेशनद्वारे पैसे कमवण्याच्या विचारात होते. पण ही कृती त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता होती. आठ डॉलर्स देऊन, अनेक युजर्सनी फेक अकाउंट (Fake account) तयार केली आणि नंतर थेट ट्विट करण्यास सुरुवात केली. यामुळेच अमेरिकेतील दिग्गज फार्मा कंपनी एली लिलीचे (Eli Lilly And Co) 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. कुणीतरी आठ डॉलर देऊन या इन्सुलिन बनवणाऱ्या कंपनीच्या नावावरुन ब्लू टिक मिळवली. त्यानंतर मग या फेक अकाउंटवरून ट्विट केले की आता इन्सुलिन मोफत मिळणार आहे. या एका ट्विटमुळे शुक्रवारी कंपनीचे शेअर्स धडाधड कोसळले आणि मार्केट कॅप 15 बिलियन डॉलरने घसरले. म्हणजेच कंपनीचे तब्बल 15 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

मस्क यांच्या निर्णयाचा अनेकांनी चुकीचा वापर केला. अनेक फेक युजर्सनी सेलिब्रिटी आणि नामांकित ब्रँड्सच्या नावावर ब्लू टिक घेतली. यानंतर ट्विटरने हा निर्णय माघे तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या निर्णयाने एली लिली या कंपनीचे खूप मोठे नुकसान केले. फेक ट्विटर अकाऊंटने एक ट्विट केले कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आणि शुक्रवारी बाजार उघडताच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

कंपनीने दिलं स्पष्टीकरण

एली लीली या कंपनीने या सर्व गोंधळानंतर स्पष्टीकरण करणारं ट्विट केले आहे. "ज्यांना फेक लिली अकाउंटवरून दिशाभूल करणारा संदेश दिला गेला आहे त्यांची आम्ही माफी मागतो. हे आमचे अधिकृत ट्विटर अकाउंट आहे," असे कंपनीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.