Girls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी

Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय. 

Updated: Dec 2, 2022, 01:11 PM IST
Girls Fight Video  : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी
Video fight of foreign girls that will surpass Indian girls and girls WWE viral on nmp

Girls Fight Video : आजच्या तरुण पिढीला संयम नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुलं असो किंवा मुली क्षुल्लक कारणामुळे होणार वाद हे टोकाला पोहोचतात आणि त्यांचं रुपांतर हाणामारीत होतं. सध्या सोशल मीडियावर भररस्त्यात WWE चा थरार पाहिला मिळाला. या पोरींचा हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. भारतीयांसाठी तरुणींची हाणामारी काय नवीन नाही. नुकताच संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमधील तरुणींचा राडा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

जेव्हा तरुणीचा पारा चढतो...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी मोठ्या रागात एका मुलीकडे चालत येतं आहे. त्या तरुणीच्या धानीमनी पण नसणार पुढच्या सेकंदाला तिच्यासोबत काय घडणार आहे ते. मोठ्या तावा तावात ती तरुणी जाते आणि जोरदार ठोसा त्या तरुणीला मारते. मग तीचे केस धरुन दे दणादण ठोसावर ठोसा ती मारत सुटते. आजूबाजूंच्या लोकांनाही काही कळतं नाही. ती तरुणी ज्या प्रकारे तिला धपाधप मारत सुटते ते पाहून अखरे दोन व्यक्ती त्यांना बाजूला करतात. 

 

हेसुद्धा वाचा - Video : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का

 

व्हिडिओ व्हायरल 

हा व्हिडिओ ट्वीटवर @brazyfistt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म व्हायरल होतं आहे.

या तरुणीने दुसऱ्या तरुणीला एवढी का हाणामारी केली याचं कारण स्पष्ट नाही. हा व्हिडिओ परदेशातील आहे एवढंच समजंत.