तुम्हीसुद्धा कारमध्ये मेकअप करता? चुकूनही असं करु नका... संपूर्ण गाडी जळून खाक

सोशल मीडियवर एका महिलेने आपल्याबाबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. कारमध्ये मेकअप करणं या महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे संपूर्ण कार जळून खाक झाली. नेमकं काय घडलं याचा व्हिडिओ महिलेने शेअर केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 8, 2023, 06:15 PM IST
तुम्हीसुद्धा कारमध्ये मेकअप करता? चुकूनही असं करु नका... संपूर्ण गाडी जळून खाक title=
संग्रहित फोटो

Viral Video : युरोपात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्याला ग्लोबल वॉर्मिंगला (Global Warming) जबाबदार धरले जात आहे. असं म्हटलं जातं की 1947 नंतर प्रथमच त्यांना अशी उष्णतेची लाट (Heat Wave) आली आहे. अहवालानुसार, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन आणि ग्रीसमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जंगलांना आग (Fire) लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होत आहे.  परिणामी छोट्या-मोठ्या आगीच्या घटना समोर येत आहेत. रस्त्य्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला अशीच अचानक आग लागल्याचा एक व्हिडिओ सध्या सशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. एका महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

पण हा व्हिडिओ केवळ बघण्यासाठी नाही तर यातून प्रत्येकाने धडा घेण्याची गरज आहे. एका महिलेने आपली कार एका रस्त्याच्या कडेला उभी केली. प्रचंड ऊन असल्याने महिलेने घाईघाईत कार लॉक केली आणि तिथून निघून गेली. पण जेव्हा ती परतली तेव्हा कारच्या मागच्या सीटचा भाग संपूर्ण जळून खाक झाला होता. संपूर्ण कारमध्ये धुर पसरला होता. 

आग लागण्याचं कारण काय?
आता तुम्ही विचार करत असाल की बंद असलेल्या कारमध्ये आग कशी लागली. कारमध्ये कोणतेही ज्वलनशील पदार्थ नव्हते. पण जेव्हा आगीच्या कारणांचा शोध घेतला तेव्हा वेगळच कारण समोर आलं आहे. वास्तविक त्या कारची मालक असलेल्या महिलने कारच्या मागच्या सीटवर मेकअप बॉक्समधला एक आरसा उघडा ठेवला होता. महिलेच्या कारमध्ये तिचं मेककिप किट होतं. यात लिपस्टिक, फाउंडेशन होतं. त्याचबरोबर एक छोटा आरसा होता. कारमधून बाहेर पडताना या महिलेने मेकअप केला आणि आरसा बॉक्समध्ये न टाकताच मागच्या सीटवर तसाच ठेवून दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Morgan Walsh (@zengazenga)

रिफ्लेक्शनमुळे लागली आग
प्रखर ऊन होतं, उन्हाची किरणं कारमध्ये असेल्या आरशावर पडत होती आणि आरशातून प्रतिबिंब कारमध्ये ठेवलेल्या पिशव्यांवर पडत होती. बराच वेळ प्रतिबिंब प्लास्टिकच्या पिशव्यांवर पडल्याने पिशव्यांनी पेट घेतला. त्यातच कारच्या सीट फोमच्या असल्याने झटक्यात सीटलाही आग लागली. महिला परतताच तिला कारमध्ये धुर दिसला. त्यानंतर तीने तात्काळ आग विझवली.

या घटनेचा व्हिडिओ महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रखर उन्हात कारमध्ये आरसा उघडा ठेवू नका अशी विनंती तीने व्हिडिओतून लोकांना केली आहे.