असं काही झालं की 'त्या' मॉडेलला रॅम्पवरच रडू कोसळलं

ती रॅम्पवर आली तेव्हा अनेकांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. पण...

Updated: Nov 12, 2018, 12:32 PM IST
असं काही झालं की 'त्या' मॉडेलला रॅम्पवरच रडू कोसळलं

मुंबई : रोजच्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांचं महत्त्वं अनन्य़साधारण असतं. मुळात त्या गोष्टींशी, वस्तूंशी, व्यक्तींशी आणि ठिकाणांशी एक वेगळ्याच प्रकारचं नातं जोडलं गेलेलं असतं. मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा ही त्या अमकक एका गोष्टीसाठी असचे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ पाहून याचाच प्रत्यय येत आहे.

एका फॅशन शोमधील हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण म्हणजे त्यात दिसणारी किंबहुना रडणारी सुपरमॉडेल. 

फॅशन विश्वात जवळपास २० वर्षांचा अनुभव असणाऱ्या आंद्रीयाना लिमा नावाच्या या मॉडेलने नुकतच या झगमगत्या विश्वाला रामराम केल्याचं पाहायला मिळालं. २० वर्षांमध्ये १८ रनवे शो करणाऱ्या ब्राझिलियन मॉडेल आंद्रीयानाने वयाच्या ३७ व्या वर्षी Victoria’s Secret साठी आपला शेवटचा वॉक केला. 

बेबी ब्ल्यू या रंगाच्या सुरेख अशा ड्रेसमध्ये ती रॅम्पवर आली तेव्हा अनेकांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. डिझायनर ड्रेसला लांब पिसाऱ्याची जोड मिळाल्यामुळे ती एखाद्या काल्पनिक पात्राप्रमाणेच दिसत होती. 

खुद्द आंद्रीयानानेही या ब्रँडशी असणाऱ्या नात्याचा शेवट एक सुरेख आणि भावनिक पोस्ट लिहून केला. पण, खऱ्या अर्थाने तिचा हा वॉक मात्र पुढेही कायम स्मरणात राहील यात वाद नाही.