WHO चा इशारा : आता यापुढे अधिक प्राणघातक होऊ शकतो कोरोना, केले हे आवाहन

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा जगाला कोरोनाव्हायरसविषयी सावध केले आहे. डब्ल्यूएचओने म्हटेल आहे, कोरोना साथीचे दुसरे वर्ष अधिक घातक सिद्ध होईल. 

Updated: May 15, 2021, 11:34 AM IST
WHO चा इशारा : आता यापुढे अधिक प्राणघातक होऊ शकतो कोरोना, केले हे आवाहन

जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा जगाला कोरोनाव्हायरसविषयी सावध केले आहे. डब्ल्यूएचओने म्हटेल आहे, कोरोना साथीचे दुसरे वर्ष अधिक घातक सिद्ध होईल. त्याचबरोबर श्रीमंत देशांना लहान मुलांना लस ( Corona Vaccine)न देता त्याऐवजी गरीब देशांना प्रथम लस देण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन ते कोरोनायुद्धात पुढे येतील. कॅनडा आणि अमेरिका यांनी नुकतीच 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यास मान्यता दिली आहे, तर भारतमध्ये (India) मुलांच्या लसींच्या चाचण्यांनाही मान्यता देण्यात आली आहे.

Ghebreyesus यांनी सांगितले

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहोम गेब्रेयसियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी शुक्रवारी सांगितले की, साथीच्या रोगाचे दुसरे वर्ष हे पहिल्या वर्षापेक्षा अधिक प्राणघातक ठरणार आहे. म्हणूनच श्रीमंत देशांनी सध्याच्या काळात मुलांना लसीकरण टाळून गरीब देशांना मदत केली पाहिजे. ते म्हणाले, 'काही देशांना मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी लसी का घ्यायची आहे हे मला समजू शकते, परंतु आत्ता मी त्यांना आवाहन केले आहे की त्यांनी यावर पुनर्विचार करा आणि त्याऐवजी  Covaxसाठी लस दान करा'.

भारताच्या स्थितीबद्दल चिंता

भारत सध्या कोरोना (Coronavirus) साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहे. येथे कोरोना संसर्गाने ज्या वेगाने वेग पकडला आहे, त्याने संपूर्ण जग हादरवून टाकले आहे. भारत देशाविषयी बोलताना डब्ल्यूएचओ प्रमुख  गेब्रेयसियस म्हणाले, की भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. या कठीण काळात भारताला मदत करणार्‍या सर्वांचे आम्ही आभार मानतो.

Covax म्हणजे काय?

कोवाक्स (Covax) ही कोरोना लसवरील जागतिक गठबंधन आहे. प्रत्येक देशात लस पोहचविणे हा त्याचा हेतू आहे, जेणेकरुन कोरोना पूर्णपणे नष्ट होऊ शकेल. या संघटनेचे नेतृत्व जीएव्हीआय (GAVI) करीत आहे. जीएव्हीआय हा कोरोना महामारी तयारीसाठीचा नवीन  (Epidemic Preparedness Innovation) आणि डब्ल्यूएचओ यांच्यात एक संबंध आहे. डब्ल्यूएचओ वारंवार श्रीमंत देशांना गरीब देशांनाही पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहे.