Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तणाव अखेर गुरुवारी युद्धात बदलला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली. युक्रेनच्या लष्कराने शस्त्र खाली ठेवावे, असे पुतीन यांनी म्हटले आहे. यानंतर युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोटांच्या बातम्या समोर येत आहेत.
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले असून, युक्रेनचा ताबा घेण्याचा रशियाचा कोणताही इरादा नाही. परंतू बाह्यधोका असेल तर त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिले जाईल.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आदेशानंतर रशियाची युक्रेनवर लष्करी कारवाई सुरूच आहे. रशिया युक्रेनवरही हवाई हल्ले करत आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर बेलारूसमधूनही सैन्य युक्रेनवर हल्ल्यासाठी तयार झाले आहेत.
खेरसन विमानतळावरही हल्ला झाला. या ठिकाणी प्रचंड मोठ्या ज्वाळा दिसत होत्या.आता रशियन सैन्याने युक्रेनचे लष्करी आणि हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. दुसरीकडे, युक्रेनने आपण हार मानणार नसल्याचे ठामपणे दाखवले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) तातडीच्या बैठकीत रशियाला संयम बाळगण्यास सांगितले तेव्हा रशियाच्या अध्यक्षांनी ही स्फोटक घोषणा केली. त्
पुतीन म्हणाले, 'पूर्व युक्रेनमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे करणे आवश्यक होते. अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून आम्ही हल्ल्याचे निमित्त काढू, असे खोटे भाकीत केले जात असल्याचेही ते म्हणाले. युक्रेनियन आणि रशियन सैन्यांमधील संघर्ष अपरिहार्य, तातडीचा आणि काळाची गरज होता. असे पुतीन यांनी म्हटले आहे.
युक्रेनने नाटोमध्ये सामील होऊ नये यासाठी रशियाचा आग्रह होता. परंतू त्याकडे दूर्लक्ष करून रशियाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या बाजूने कल दिला.
आज रशियाने विशेष लष्करी कारवाई करून म्हटले की, 'आम्ही युक्रेनमध्ये एक विशेष लष्करी कारवाई सुरू करत आहोत, ज्याचा उद्देश नि:शस्त्रीकरण आहे. संपूर्ण युक्रेन काबीज करणे हे आमचे उद्दिष्ट नाही. देश कोण चालवायचा हे युक्रेनचे लोक स्वतः ठरवतील.