कॅनडा : सध्या कॅनडामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीच्या आवश्यकतेविरोधात जोरदार निदर्शनं सुरू आहेत. या निदर्शनादरम्यान पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या कुटुंबासह घर सोडलंय. यावेळी जस्टिन ट्रुडो गुप्त ठिकाणी गेल्याची चर्चा आहे. ट्रुडो सरकारने ट्रक चालकांना अमेरिकेची सीमा ओलांडण्यासाठी लसीकरण करणं बंधनकारक केलं आहे. याबाबत वाहनचालकांनी विरोध सुरू केलाय.
आंदोलकांनी कोविडच्या या निर्बंधांची तुलना फासीवादाशी केलीये. शनिवारी राजधानीत निदर्शनं करत लोकांनी पीएम ट्रुडो यांच्यावर जोरदार टीका केली.
यावेळी एका आंदोलकाने सांगितलं की, आम्हाला असं वाटतंय की, लसीकरण अनिवार्य करणं हे आरोग्याशी संबंधित नाही. ही गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची सरकारचा डाव आहे. कॅनडात निदर्शनं खूप तीव्र झालीयेत. शनिवारी राजधानी ओटावा इथल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाला 50 हजार ट्रकचालकांनी घेराव घातला."
या निदर्शनांचं स्वरूप पाहता देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेत पोलीस हाय अलर्टवर आहेत. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, शनिवारी सुमारे 10,000 लोक संसदेत पोहोचले. सध्या संसदेच्या संकुलात किती आंदोलक उपस्थित आहेत, याचा नेमका आकडा पोलिसांकडे नाही.
यापूर्वी, एक वादग्रस्त विधान करताना, कॅनडाच्या पंतप्रधानांनी ट्रकचालकांना 'महत्त्व नसलेले अल्पसंख्याक' म्हटलं होतं. यामुळे ट्रकवालेही भडकलेत. पीएम ट्रुडो म्हणाले की, या व्यक्ती हे विज्ञानविरोधी आहेत आणि ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतर कॅनेडियन लोकांसाठीही धोका निर्माण करताताय.