महिलेचा भूताचा खेळ खल्लास! भूत बनवून घाबरवणं पडलं महागात!

एका महिलेने भूत बनवून इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र असं करणं तिला फार महागात पडलं आहे. 

Updated: Oct 23, 2021, 10:32 AM IST
महिलेचा भूताचा खेळ खल्लास! भूत बनवून घाबरवणं पडलं महागात!

मेक्सिको : एखाद्या व्यक्तीने खोटं खोटं भूत बनवून घाबरवलं असेल. असंच मेक्सिकोमध्ये एका महिलेने भूत बनवून इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र असं करणं तिला फार महागात पडलं आहे. 

मेक्सिको सिटीमध्ये भितीदायक मेकअप करूण आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये रात्री ही महिला रस्त्यावर चालत होती. तिला या रूपात पाहून एक माणूस इतका घाबरला की त्याने त्या महिलेवर थेट गोळ्या झाडल्या. ही घटना मेक्सिकोतील नौकल्पन डी जुआरेझ इथे घडलीये. दरम्यान पोलिसांनी मृताची ओळख उघड केलेली नाही.

घाबरलेल्या लोकांनी व्हीडिओ बनवला

'द सन' च्या अहवालानुसार, मृत्यू झालेल्या महिलेचे वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. तिने स्वतःला लॅटिन अमेरिकेतील 'ला लोरोना' सारखे कपडे घातले होते. असं म्हटलं जातंय की, ला लॉरोना हे एक भूत होतं जे आपल्या मुलाच्या आठवणीने रडत रस्त्यावर फिरत होतं. मृत महिला रात्री त्याच अशाच स्टाईलमध्ये फिरत होती. शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी तिचा व्हिडिओही बनवला आहे.

एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं की, ती महिला अतिशय भीतीदायक गेट-अपमध्ये होती. ती रडत रडत ओरडायची. तिला पाहून एक माणूस इतका घाबरला की त्याने गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेवर पोलिसांनी बाळगलं मौन 

15 ऑक्टोबरच्या या घटनेचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस म्हणतात, याविषयी सध्या फारसं काही सांगता येणार नाही. 31 ऑक्टोबर रोजी 'हॅलोविन डे' साजरा करण्यासाठी मेक्सिकोमध्ये तयारी सुरू आहे. यानिमित्ताने आत्मा, भूत अशा माणसांचा पूर्ण मेकअप केला जातो.