बॉयफ्रेंडची हत्या करून बिर्याणी बनवली आणि कामगारांना खायला दिली

प्रेमामध्ये फसवणूक झाल्यामुळे एका महिलेनं त्याच्या बॉयफ्रेंडची हत्या केली.

Updated: Nov 22, 2018, 07:55 PM IST
बॉयफ्रेंडची हत्या करून बिर्याणी बनवली आणि कामगारांना खायला दिली
प्रतिकात्मक फोटो

दुबई : प्रेमामध्ये फसवणूक झाल्यामुळे एका महिलेनं त्याच्या बॉयफ्रेंडची हत्या केली. हत्या केल्यानंतर या महिलेनं बॉयफ्रेंडच्या शरिराचे छोटे-छोटे तुकडे केले आणि त्याची बिर्याणी बनवून कामगारांना खायला दिली. दुबईमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडनं फसवणूक केल्यामुळे मला राग आला आणि मी त्याची हत्या केली अशी कबुली या महिलेनं दिली आहे. कामगारांना मात्र आपण जी बिर्याणी खातोय ती कुठल्या जनावराची नसून एका माणसाच्या मासाची आहे हे माहिती नव्हतं.

खलीज टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार ही महिला बराच कालावधी या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. काही दिवसांपूर्वी या दोघांचं ब्रेक-अप झालं. यानंतर बॉयफ्रेंडनं तिला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत असल्याचं सांगितलं आणि या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. हे भांडण टोकाला गेलं आणि महिलेनं बॉयफ्रेंडची हत्या केली.

हत्या लपवण्यासाठी महिलेनं बॉयफ्रेंडच्या शरिराचे छोटे-छोटे तुकडे केले आणि त्याची बिर्याणी केली. ही बिर्याणी महिलेनं कामगारांना दिली आणि उरलेली बिर्याणी शेजाऱ्यांच्या कुत्र्याला दिली.

चार दिवस कामगारांनी बिर्याणी खाल्ली

शरिराची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेनं तिचे दागिने विकले आणि चाकू, सुरे, फ्राईंग पॅन आणि मोठा प्रेशर कूकर विकत घेतले. ही महिला लागोपाठ ४ दिवस बॉयफ्रेंडच्या शरिराचे तुकडे टाकून बिर्याणी बनवत होती. बिर्याणी बनवून ही महिला तिच्या कामगारांना खायला द्यायची. पकडलं जायच्या भीतीमुळे ही महिला रात्रीच्या वेळी बिर्याणी तयार करायची.

मिक्सरमध्ये अडकलेला दात मिळाल्यामुळे महिलेच्या भावाला संशय आला आणि त्यानं याची माहिती पोलिसांना दिली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घरात सापडलेल्या दातांची डीएनए टेस्ट केली. डीएनए टेस्टनंतर या महिलेचं बिंग फुटलं.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x