मुंबई : सॅनेटरी पॅडचा वापर मुली आणि महिला मासिक पाळीच्या दरम्यान करतात आणि त्याला फेकून देतात. पण इंडोनेशियाच्या काही युवांनी याचा वापर दुसऱ्या गोष्टीसाठी केला आहे. ऐकायला हे विचित्र वाटेल... पण हे खरं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरूण वापरलेल्या सॅनेटरी पॅडचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचं समोर आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, हे तरूण वापरलेल्या पॅडला उकळत्या पाण्यात घालून त्यातून निर्माण होणाऱ्या द्रवाचा नशेकरता वापर करत आहेत.
सॅनिटरी पॅडमध्ये असलेल्या क्लोरिनला उकळवून ते पाण्यात विरघळते आणि नशेचा पदार्थ त्यामध्ये जातो. ज्या पाण्याला प्यायल्यानंतर लोकं बेशुद्ध होतात आणि एका वेगळ्या दुनियेत जातात. हे लोकं जास्त करून कचऱ्याच्या डब्यातून सॅनिटरी पॅड काढतात आणि उकळत्या पाण्यात घालतात आणि मग ते थंड पाणी पितात.
तरूणांना नशा करण्यासाठी हे अतिशय स्वस्त साधन आहे. ज्या तरूणांकडे दारू आणि ड्रग्ससाठी पैसे नसतात असे तरूण या सॅनिटरी पॅडचा वापर करतात. इंडोनेशियात 13 ते 16 वर्षांचा तरूण वर्ग ही नशा करताना दिसत आहे. ज्यांनी याचा वापर केला आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पाण्याची चव अतिशय कडू असते. पण हे पाणी प्यायल्यावर लगेचच याची नशा चढते.