'अश्रूंची झाली बिले'; हॉस्पिटलचं भरमसाठ बिलं पाहून तिच्या पायाखालची जमीनचं सरकली

हॉस्पिटलं म्हटलं तर रडण आलचं. या बातमीत अश्रूंचीही किंमत लावली गेलीय. ही किंमत पाहून रूग्णासह तिचे नातेवाईक चक्रावलेत. 

Updated: May 20, 2022, 04:19 PM IST
 'अश्रूंची झाली बिले'; हॉस्पिटलचं भरमसाठ बिलं पाहून तिच्या पायाखालची जमीनचं सरकली title=

मुंबई : हॉस्पिटलं म्हटलं तर रडण आलचं. रुग्णाला धीर देता देता, आर्थिक अथवा मानसिक परीस्थितीत सावरता सावरता आपसूकचं डोळयातून अश्रू येताततंच. मात्र जर तूमच्या अश्रूंची जर कोणी किंमत लावली तर काय कराल. मुळात अश्रूंचीही किंमत लावली जाते हा प्रकारच नवा आहे. मात्र या बातमीत अश्रूंचीही किंमत लावली गेलीय. ही किंमत पाहून रूग्णासह तिचे नातेवाईक चक्रावलेत. 

न्यूयॉर्क शहरात अशीच एक घटना घडलीय. या घटनेत एका महिलेला हॉस्पिटलमध्ये रडल्याबद्दल बिलं आकारण्यात आलं आहे.  महिलेला तिच्या हॉस्पिटलच्या बिलात रडल्याबद्दल अतिरिक्त  40 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानूसार 3100 रुपयांपेक्षा जास्त आकारण्यात आलेत. पेशंटच्या बहिण कॅमिल जॉनसन हिने ट्विट करत याबाबत माहिती दिली. 

कॅमिलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'माझी धाकटी बहीण गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृतीशी संबंधित कारणांमुळे अस्वस्थ होती. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे घेऊन जावे लागले. यावेळी रुग्णालयात रडल्याप्रकरणी तिच्याकडून अतिरिक्त  40 डॉलर आकारले. 

तब्येतीपासून ती आधीच संघर्ष करत होती. ज्यामुळे तिची चिडचिड होत होती. मात्र तिचं आजारपण व डोक्यावरचं ओझ कमी करण्याऐवजी, रुग्णालय प्रशासनाने तिला अतिरिक्त 40 डॉलर दिले. विशेष म्हणजे वैद्यकीय चाचणीसाठी आकारल्या गेलेल्या पैशांपेक्षा रूग्णालयात अश्रू आकारल्या प्रकरणाचे पैसे जास्त आकारले होते.  या घटनेवर अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच सोशल मीडियावर या बिलासकट महिलेचा फोटो मीम्स सारखा व्हायरल होत आहे.