Longest Nose Record: जगात कोण काय विक्रम करेल याचा काही नेम नाही. काही जण आपला विक्रम गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये (guinness world record) नोंदवला जावा, यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतात. कधी कधी प्रयत्नांना यश मिळत नाही. तर काही जण विक्रम नोंदवण्यात यशस्वी होतात. दुसरीकडे काही जणांना नैसर्गिक देणं असतं आणि त्याची नोंद घेतली जाते. असाच एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत व्यक्तीचं लांबलचक नाक दिसत आहे. या फोटोनं सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हिस्टोरिक वीड्स नावाच्या ट्विटर अकाउंटवरून रिप्लेच्या 'बीलीव इट ऑर नॉट' म्यूझियममध्ये ठेवलेल्या एका चेहऱ्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 12 नोव्हेंबरला हे ट्वीट करण्यात आलं होतं. त्यामुळे लांब नाकाची (Long Nose) चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
"थॉमस वॅडहाऊस हा 18 व्या शतकात राहणारा इंग्रजी सर्कस कलाकार होता. जगातील सर्वात लांब नाक असल्याने प्रसिद्ध होते. नाकाची लांबी 7.5 इंच (19 सें.मी.) इतकी आहे", फोटो पोस्ट करताना ट्वीटमध्ये असं लिहिलं आहे. या ट्वीटला आतापर्यंत 1.20 लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केलं आहे आणि 7 हजाराहून अधिक लोकांनी रीट्वीट केलं आहे.
Thomas Wadhouse was an English circus performer who lived in the 18th century. He is most famously known for having the world's longest nose, which measured 7.5 inches (19 cm) long. pic.twitter.com/Gx3cRsGXxd
— Historic Vids (@historyinmemes) November 12, 2022
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या विक्रमाची नोंद घेतली आहे. आपल्या पेजवर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. थॉमस वॅडहाऊसस 1770 च्या दशकात इंग्लंडमध्ये राहात होते. तसेच सर्कसमधील एक सदस्य होते. थॉमस यांच्या नाकाची लांबी 19 सेमी (7.5 इंच) होती. दुसरीकडे, सध्या जिवंत असलेल्या सर्वात लांब नाकाचा विक्रम तुर्कीच्या मेहमेट ओझुरेक यांच्या नावावर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने या विक्रमाची नोंद केली होती त्यांच्या नाकाची लांबी 3.46 इंच मोजली गेली आहे.