भारताकडे येणारं जहाज समुद्री चाच्यांनी घेतलं ताब्यात; 25 जणांना भर समुद्रात केलं किडनॅप

World News : इराणचं समर्थन असणाऱ्या हूती समुद्रा चाच्यांनी तांबड्या समुद्रात भारताच्या दिशेनं येणाऱ्या एका भल्यामोठ्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतलं आहे. 

सायली पाटील | Updated: Nov 20, 2023, 02:40 PM IST
भारताकडे येणारं जहाज समुद्री चाच्यांनी घेतलं ताब्यात; 25 जणांना भर समुद्रात केलं किडनॅप title=
yemen houthi hijacked india bound galaxy cargo ship in red sea World news

World News : इराणचं समर्थन असणाऱ्या हूती समुद्रा चाच्यांनी तांबड्या समुद्रात भारताच्या दिशेनं येणाऱ्या एका भल्यामोठ्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतलं आहे. जहाज चालवणाऱ्या गटालाच चाच्यांनी निशाण्यावर घेतलं असून, त्यांनी कूटनिती वापरत भर समुद्रातच जहाजावर उतरत एकच धुमाकूळ घातला. जहाजावरील 25 जणांचं अपहरण करत या चाच्यांनी जहाज एका बंदरापाशी आणलं. एका अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी या अपहरणाच्या कृत्याची जबाबदारी घेतली. 

चाच्यांच्या म्होरक्यानं जाहीरपणे काय म्हटलं? 
हूती चाच्यांच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकातून त्यांचा म्होरक्या याह्या सारी यानं म्हटलं, 'आमच्या गटातील मुलांनी तांबड्या समुद्रामध्ये एक मोहिम हाती घेतली होती. ज्याअंतर्गत एका इस्रायली जहाजाला ताब्यात घेतलं गेलं. पुढं या जहाजाला येमेनच्या किनाऱ्यावर आणण्यात आलं. या जहाजावर कार्यरत असणाऱ्या गटासोबत इस्लाम धर्माला अनुसरून असणाऱ्या मुल्यांनुसार व्यवहार केला जात आहे.'

गाझामध्ये इस्रायलविरोधात हमासच्या क्रूर आक्रमकतेच्या धर्तीवर तांबड्या समुद्राच्या माध्यमातून तेल अवीवशी संपर्कात असणाऱ्या जहाजांवर निशाणा साधणार असल्याचा इशारा यापूर्वीच हूतींनी दिला होता. इस्रायलशी संबंध असल्याच्या कारणावरून या जहाजावर हूती चाच्यांनी ताबा घेतला. पण, इस्रायलकडून मात्र हुतींकडून करण्यात आलेल्या या दाव्यावरून नकार दिला होता. 

हूतींचा बंडखोर समूह नेमकं काय करतो? 

हूती एक जैदी रशिया मुस्लिम बंडखोर संघटना आहे. 1990 मध्ये  हुसैन बदरेद्दीन अल-हूतीच्या नेतृत्त्वात येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांला विरोध करण्यासाठी ही संघटना सुरु करण्यात आली. हऊसी असा हा मूळ शब्द या संघटनेच्या नावानुसार पुढे हूती हे नाव ठेवण्यात आलं. हा येमेनमधील एक अल्पसंख्यांक शिया समुदाय आहे. हूती स्वत:ला ‘अंसार अल्लाह’ म्हणजेच अल्लाहचे समर्थक म्हणन ओळखले जातात. 

हेसुद्धा वाचा : स्टफिंग बाहेर न पडता कसा बनवावा एकदम परफेक्ट पराठा? 

हूती समुहाकडून सुन्नी सत्ताधारी सरकारचा कडाडून विरोध केला जातो. 2004 मध्ये त्यांनी येमेनमधील सरकारविरोधात युद्धही पुकारलं होतं. सध्याच्या घडीला या बंडखोर समुदायाचं नेतृत्त्वं अब्दुल मलिक अल-हूतीकडे आहे.