Ashadhi Ekadashi 2023 Live Updates: विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आज आषाढी एकादशीचा उत्साव अख्खी पंढरपूरनगरी लाखो भक्तांनी विठुमय झाली आहे. भक्तांच्या महासागराने चंद्रभागी न्हाऊन निघाली आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली.
29 Jun 2023, 07:27 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates: यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगल काळे गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूरची वारी पायी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दाम्पत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे हे शेतकरी आहेत. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत मुख्यमंत्री यांच्यासोबत हा मान मिळेल अशी भावना काळे दाम्पत्याची व्यक्त केलीय.
29 Jun 2023, 07:15 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates: विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये संत गजानन महाराज मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी मोठी केली आहे. आषाढी एकादशी निमित्त जे भाविक विठुरायाच्या भेटीला पंढरपूरला जाऊ शकले नाही असे भाविक शेगाव येथील संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन धन्य होत आहेत. मध्य रात्रीपासून राज्यभरातील भाविकांनी शेगाव मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संत नगरी शेगावला मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
29 Jun 2023, 04:52 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : महापूजा आणि सत्कार समारंभ झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
#पंढरपूर | आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल - रुक्मिणी यांच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद...https://t.co/aYgiL7rd9F
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
29 Jun 2023, 04:49 वाजता
Mumabi Vitthal Mandir Wadala : मुंबईतील वडाळ्याचं विठ्ठल-रूक्मिणीचं मंदीर प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. आषाढी एकादशीनिमित्त फुलांची आरास करण्यात आली आहे. ज्या भाविकांना पंढरपूर जाणं शक्य नसतं ते मुंबईतील या वडाळ्याच्या विठुरायाच्या दर्शनाला येतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पण मंदिराबाहेर मोठी जत्रा भरली आहे.
29 Jun 2023, 04:33 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : विकास आराखड्याचं काय असा प्रश्न सगळं विचारतात. त्याबद्दल काळजी करु नका. हे सर्वसामान्यांचं सरकार, त्यामुळे सर्वांच्या समितीने निर्णय घेऊ, असं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. कोणालाही नाराज करणार नाही, प्रत्येकाला विश्वासात घेऊनचं विकास आराखडाचा निर्णय घेण्यात येईल, असं ते यावेळी म्हणाले. मविआच्या काळात सगळं थांबलं होतं, आता सगळी कामं सुरु झालीयेत, असंही वक्तव्य त्यांना यावेळी केलं.
29 Jun 2023, 04:28 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : सलग दुसऱ्या वर्षी मला विठ्ठलाच्या महापूजेचं भाग्य मिळालं, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. 30 जूनला सरकारला एक वर्ष होईल. गेल्यावेळी सरकार बनवलं आणि मी महापूजेसाठी आलो होतो. विठुरायाचा कृपेने सर्व सुरळीत चालं असून सरकार वर्ष पूर्ण करणार, असंही ते म्हणाले.
29 Jun 2023, 04:23 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ देत हे साकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.
29 Jun 2023, 04:08 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : सत्कार सोहळ्याच्या वेळी गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. वारकऱ्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणारा पहिला मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत, असं ते यावेळी म्हणाले.
29 Jun 2023, 04:03 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : काळे दाम्पत्याला विठ्ठलाची मूर्ती आणि वृक्ष रोप देऊन मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार यांच्या मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला.
29 Jun 2023, 04:00 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : ऐतिहासिक निर्णय
यंदा विशेष म्हणजे अगदी महापूजा सुरु असतानाही भाविकांना विठुरायाचं दर्शन घेता येत आहे. . इतिहासात पहिल्यांदाच असा एखादा निर्णय घेण्यात आल्यामुळं सध्या सर्वत स्तरांतून या निर्णयाचं स्वागत होत आहे.