Ashadhi Ekadashi 2023 Live Updates: विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आज आषाढी एकादशीचा उत्साव अख्खी पंढरपूरनगरी लाखो भक्तांनी विठुमय झाली आहे. भक्तांच्या महासागराने चंद्रभागी न्हाऊन निघाली आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली.
29 Jun 2023, 02:32 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : आषाढी एकादशीलाच देवशयनी आणि हरिशयनी एकादशी असं म्हणतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात म्हणजे वर्षाला 24 एकादशी असतात. पण यंदा चातुर्मास म्हणजेच अधिमास आल्यामुळे दोन एकादशी जास्त येणार आहे.
29 Jun 2023, 02:24 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे या पुजा करत आहेत. यावेली मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित आहेत.
Ashadhi Ekadashi Mahapuja 2023 LIVE | पंढरपुरातून विठ्ठल-रूक्मिणी महापूजा LIVE | Zee 24 Taas LIVEhttps://t.co/WhtiDMBLqw@mieknathshinde #AshadhiEkadashi2023 #AshadhiEkadashi #Pandharpur
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 28, 2023
29 Jun 2023, 02:22 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, अब्दुल सत्तार अशी मंत्र्यांची फौज पंढरपुरात आहे.
29 Jun 2023, 02:10 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंदिर परिसरात दाखल झाले आहे.
29 Jun 2023, 02:02 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगल काळे गेल्या पंचवीस वर्षापासून पंढरपूरची वारी पायी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दाम्पत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे हे शेतकरी आहेत.
हेसुद्धा वाचा - Ashadhi Ekadashi : भक्तांच्या महासागरातून कसा निवडला जातो मानाचा वारकरी? मिळतो शासकीय महापुजेचा मान
29 Jun 2023, 01:59 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : दुपारी 11.30 वाजता तीन रस्ता इथे आयोजीत केलेल्या महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री वारकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मग दुपारी 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्री जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होतील.
29 Jun 2023, 01:57 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : मध्यरात्री 2.20 वाजता आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता विश्रामगृहमध्ये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता तीन रस्ता या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे.
29 Jun 2023, 01:50 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : पंढरपूर नगरीत प्रवेश करताच वारकरी बांधवांसाठी पंढरपुरात करण्यात आलेल्या स्वच्छता व्यवस्थापनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.
#पंढरपूर नगरीत प्रवेश करताच सर्वप्रथम #आषाढी_एकादशी निमित्ताने #वारकरी बांधवांसाठी शहरात करण्यात आलेल्या स्वच्छता व्यवस्थापनाचा आढावा घेतला.
शहरातील रस्त्यात अनेक ठिकाणी वारकरी बांधवांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपातील शौचालये व स्वच्छतागृहांना भेट देऊन ती खरोखरच… pic.twitter.com/EOpW1OHzcy
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2023
29 Jun 2023, 01:48 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता आणि ग्रामसभा दिंडी 2023 चा समारोप करण्यात आला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते.
#पंढरपूर | मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२३’ चा समारोप करण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच ग्रामविकास विभागाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात या स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात… pic.twitter.com/SSGW3spJBy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
29 Jun 2023, 01:39 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा करतील. त्यानंतर मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात येईल. सत्कारानंतर पहाटे साडेचार वाजता मुख्यमंत्री विश्रामगृहाकडे जातील.