Ashadhi Ekadashi 2023 Live Updates: विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणाधारत…
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आज आषाढी एकादशीचा उत्साव अख्खी पंढरपूरनगरी लाखो भक्तांनी विठुमय झाली आहे. भक्तांच्या महासागराने चंद्रभागी न्हाऊन निघाली आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली.
29 Jun 2023, 03:49 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : ऐतिहासिक निर्णय
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर विठूरायाचं मुखदर्शन बंद ठेवण्यात येतं. पण यंदा महापूजाचा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच भाविकांना विठूरायाचं मुखदर्शन घेता येत आहे. जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल- रखुमाईचं दर्शन घेता यावं यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
29 Jun 2023, 03:48 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांची पत्नी लता शिंदे आणि मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याचा पंढरपूर मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला.
29 Jun 2023, 03:20 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली.
29 Jun 2023, 02:52 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील भक्तीत दंग दिसले. मुख्यमंत्री आणि विखे यांनी फुगड्याही खेळल्या.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2023
29 Jun 2023, 02:48 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी विठ्ठल मंदिरात 15 प्रकारच्या तब्बल 6 टन फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलं खास करुन थायलंडमधून मागवली आहेत. 30 विविध प्रकारच्या फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे.
29 Jun 2023, 02:42 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला दुसऱ्यांदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगळ काळे मानाचे वारकरी असून मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा महासोहळ्यात विठुरायाचा पूजेत मग्न झाले.
29 Jun 2023, 02:42 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : अहमदनगर जिल्ह्यातील काळे दाम्पत्याला दुसऱ्यांदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब आणि मंगळ काळे मानाचे वारकरी असून मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा महासोहळ्यात विठुरायाचा पूजेत मग्न झाले.
29 Jun 2023, 02:38 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : आषाढी एकादशीची कथा
पुरातन काळापासून आषाढी एकादशीची ही कथा सांगण्यात येते. त्या म्हटलं आहे की, सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट होता. त्याचा राजात प्रजा आनंदी राहायची. पण त्या राज्यात एक वेळ अशी आली की, सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही. प्रजेवर संकट कोसळलं, राजाही अस्वस्थ झाला. एकेदिवशी यावर उपाय शोधण्यासाठी राजा जंगलात निघून गेला. जंगलात वनवन भटकत असताना त्याला अंगिरा ऋषींचं आश्रम दिसलं.
29 Jun 2023, 02:34 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : आषाढी एकादशी मुहूर्त पहाटे 3:18 वाजेपासून होणार 30 जूनला दुपारी 2:42 वाजेपर्यंत असणार आहे.
29 Jun 2023, 02:33 वाजता
Ashadhi Ekadashi 2023 Live Updates : हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, मानवाची एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. तर दक्षिणायन ही देवाची रात्र तर उत्तरायण ही देवाचा दिवस असतो. कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. म्हणजे देव झोपी जातात असं म्हणतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात.