Shiv Jayanti Live : 'संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप'; पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शिवजयंतीच्या शुभेच्छा

Shiv Jayanti Live Updates : छत्रपती शिवरायांच्या 394व्या जयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. 

Shiv Jayanti Live : 'संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप'; पंतप्रधान मोदींच्या मराठीतून शिवजयंतीच्या शुभेच्छा

Shiv Jayanti Live Updates : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती जगभरात  साजरी केली जात आहे. किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांच्या हस्ते गडदेवता शिवाई देवीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थळ अशी पालखी मिरवणूक निघाली. शिवजन्म स्थळी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते.

19 Feb 2024, 09:12 वाजता

Shiv Jayanti Live Updates : आग्र्यातील किल्ल्यावरही शिवजयंतीचा उत्साह

आग्रा किल्यातील दिवाण-ए-आममध्ये आज शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी होण्याचं हे दुसरं वर्षं आहे. आग्रा किल्ल्यावर यानिमित्ताने लेजर शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती लावणार आहेत.