पोपट पिटेकर, मुंबई : महाराष्ट्रात सर्वात जास्त मिरचीची लागवड केली जाते. मिरचीच्या बाजारपेठेसाठी नंदुरबार हे प्रमुख शहर आहे. मिरचीच्या उत्पादनात जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. तसेच नंदुरबार जिल्ह्यात मिरची पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
शिमला मिरचीचा वापर खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. शिमला मिरचीची लागवडीसाठी चिकणमाती असेल तर उत्तम रित्या लागवड होऊ शकेल. त्याचबरोबर शेतीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे देखील गरजेचं आहे. पावसाळ्यात म्हणजे जुलै महिन्यात तुम्ही शिमला मिरचीच्या लागवडीतून भरपूर पैसे कमवू शकता.
शेतक-यासाठी शिमला मिरची ही आता चांगलं उत्पन्न दिणारं साधन बनत आहे. शिमल्या मिरचीच्या माध्यामातून काही महिन्यातच म्हणजे 2 ते 3 महिन्यातच चांगले पैसे कमवू शकता. अनेक शेतकरी शिमला मिरचीची शेती करताना मोठ्या प्रमाणात आता दिसून येतात. यामध्ये भारताचा विचार केला तर हरियाणा, कर्नाटक, पंजाब, झारखंड, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिमला मिरचीची लागवड केली जाते.
सिमला मिरचीची लागवड कधी करावी ?
शेतक-यांनो शिमला मिरचीची लागवड करण्यासाठी जुलै महिना सर्वात चांगला मानला जातो. परंतू इतर अनेक राज्यांमध्ये सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील शिमला मिरचीची लागवड शेतकरी करताना दिसून येतात. शिमला मिरचीची लागवाड करताना आपलं सामान्य तापमान सर्वात चांगलं मानलं जातं. शिमला मिरचीच्या लागवडीसाठी जास्तीत जास्त 38 अशं आणि किमान 10 अंश सेल्सिअस तापमान असणं गरजेचं आहे.
लागवडीसाठी जमीन कशी पाहिजे ?
शिमला मिरचीच्या लागवडीसाठी योग्य निचरा असलेली जमीन गरजेची आहे. त्याचबरोबर मिरचीसाठी चिकणमाती असेल तर उत्तम रित्या मिरचीची लागवड होऊ शकते. तिच्या लागवडीतील जमिनीचा P.H.मूल्य 6 आणि 7 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे.
रोपे कोणती आणि कुठून घ्यायची ?
शिमला मिरचीची रोपे घेताना शक्यतो कोणत्याही नोंदणीकृत नर्सरीतूनचं घ्या. ते घेत असताना झाडे हे पूर्णपणे चांगली, निरोगी आणि एक महिना जुनी असेल हे पाहा. शेतक-यांनो शिमलाच्या वनस्पती थेट बियाण्यांऐवजी रोपांच्या स्वरुपातचं लावल्या जातात. हे देखील लक्षात घ्या.
नफा किती होतो ?
शिमला मिरचीच्या एका हेक्टरमधून कमीतकमी 240 ते 450 क्किंटल उत्पन्न तुम्ही मिळवू शकता. शिमला मिरची लावल्यानंतर ते 80 दिवसात काढणीसाठी तयार होतात. तुम्ही त्याची विक्री करून 5 ते 8 लाखांचा नफा कमवू शकता. अवघ्या 80 ते 90 दिवसांत भरघोस नफा कमवायचं असेल तर नक्की शिमला मिरचीची लागवड करा आणि चांगला नफा कमवा.