डिअर जिंदगी : तुम्ही आईला माझ्याकडे का पाठवून दिलं!

 बंगाली आंटी गेली! या आंटीचं नाव आम्हाला माहित नाही, प्रेमाने सर्व जण त्यांना अंटी या नावानेच बोलवत होते.

Updated: Jan 15, 2019, 01:27 PM IST
डिअर जिंदगी : तुम्ही आईला माझ्याकडे का पाठवून दिलं! title=

दयाशंकर मिश्र : बंगाली आंटी गेली! या आंटीचं नाव आम्हाला माहित नाही, प्रेमाने सर्व जण त्यांना अंटी या नावानेच बोलवत होते. आंटी गेल्याचं जेव्हा आम्हाला समजलं, तेव्हा २४ तास उलटले होते. ही बातमी आम्हाला उशीरा मिळण्याची अनेक कारणं होती. आता आम्ही त्या कॉलनीत नाही राहत. अंकल-आंटी या दोघांना मोबाईल ठेवणं आणि सांभाळणं त्यांच्यासाठी शक्य नाही. यामुळे आम्हाला केवळ एवढं माहित होतं की, यावेळी ते बंगळुरूमध्ये राहतात.

जेव्हा आंटी बंगळुरूला तिच्या मुलीजवळ जाणार आहे, असं समजलं, तेव्हा आम्ही तिला भेटायला गेलो. आंटीला आमच्या मुलांचे लाड करायची, पत्नीशी स्नेहाचे संबंध होते. पण ती आराम करत होती, म्हणून तिला न भेटताच आम्हाला निघावं लागलं.

'डिअर जिंदगी'चा हा अंक बंगाली आंटीच्या स्मृती जागवण्यासाठी नाही. आंटीच्या एकुलत्या एक मुलीविषयी किंवा तिच्या वागण्याबोलण्याविषयी देखील नाही. तर हा लेख आहे, ज्या समाजात संवेदना नदीसारख्या सुकून गेल्या आहेत, नीरस नातं आणि फ्लॅट संस्कृतीत इतरांची चिंता कुणीच करत नाहीय, तरी देखील एक आशा, सुख आणि सहकार्य काही लोकांकडून दिसून येतं.

'डिअर जिंदगी'चा हा लेख यासाठी आहे, ज्यात मानवता कटू आठवणीत अडकून राहू नये. एकमेकांचं सहकार्य, यासारख्या गोष्टी केवळ पुस्तकात कैद राहायला नकोत. आपल्याला नेहमी लक्षात राहायला हवं की, आत्मियता, स्नेह आपल्या सर्वांची गरज आहे. अशा गोष्टींचा नेहमी उल्लेख व्हायला हवा, म्हणून अशा गोष्टी पुन्हा पुन्हा चर्चेत आणायला हव्यात, बोलायला हव्या, लिहायला हव्यात.

आशुतोष पंत, अनिल जांगिड, अशोक जांगडा आणि सीमा पंत, पूजा, कविता आंटी हे बंगाली अंटीचे जवळचे शेजारी होते. यांनीच आंटीची देखभाल केली, हॉस्पिटलला घेऊन जाणं, डॉक्टरांच्या नियमित संपर्कात राहणं, अशी जबाबदारी आत्मीयता, स्नेह आणि सामाजिक भान आणि जबाबदारी म्हणून पार पाडली.

शेजाऱ्यांपेक्षा आंटीचे हे तीन स्व-घोषित संरक्षक होते. ज्यांनी स्वत:हून वयोवृद्ध दाम्पत्याची सेवा करण्याचा भार, एका वर्षापेक्षा अधिक काळ आपल्याकडे घेतला.

आंटीची एकुलती एक मुलगी बंगळुरूत राहते, ती आर्थिक दृष्ट्या स्वयंमपूर्ण आहे. इंदिरापुरममधील आंटीच्या २ फ्लॅटची तिच वारस आहे. तरी देखील आईविषयी रूक्षपणा मला कोणत्याही जवळच्या नातेवाईकाकडून किंवा मित्र मंडळीकडून पाहायला मिळाला नाही. ज्याप्रमाणे आंटीच्या मुलीकडून पाहायला मिळाला आहे.

या दरम्यान जेव्हा त्यांच्या मुलीला फोन केला गेला, तिने नेहमीच रूक्षपणे, अतिशय नाराज असल्यासारखी ओळख दिली. ऐंशी वर्षांच्या आईबद्दल एक सक्षम मुलीचा दृष्टीकोन प्रत्येकाला चक्रावून टाकणारा होता.

आंटीच्या मुलीला जेव्हा शेजाऱ्यांनी फोनवरून आंटीच्या तब्येतीबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांची मुलगी म्हणाली, यात काही मोठी गोष्ट नाही, तिची तेथेच देखभाल करा. मुलीकडे जाताना जेव्हा एअरपोर्टवर आंटीला रवाना करण्यात आलं, तेव्हा तब्येतीची चौकशी करण्यात आली, तेव्हा मुलीने सांगितलं, 'तिची तब्येत एवढी खराब नव्हती, तरी देखील तुम्ही तिला येथे पाठवलं. तेथे देखील तिला सहज ठेवता आलं असतं!'

मुलांपेक्षा मुली अधिक संवेदनशील असतात, मुलगी काळजी घेणारी असते, असं आपल्या आजूबाजूला सांगणारे अनेक लोक आहेत, यात मी देखील एक आहे. मी या गोष्टीला एक उदाहरण म्हणून सांगू इच्छीत नागी, पण यावरून नक्कीच हे शिकायला मिळतंय की, काळजी मुलगा अधिक घेतो की मुलगी हे 'जेंडर'वरून आता ठरवणे योग्य नाही.

एक संपन्न, सुशिक्षित मुलीचे आईसोबत मतभेद असू शकतात. पण हे कसं शक्य आहे की, आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये, तिची मुलगी शेजाऱ्यांवर यावरून नाराज आहे की, तिच्या आजारी आईला तिच्यासोबत शेजारी पाठवत आहेत.

प्रेम, स्नेह आणि काळजी घेण्याच्या चर्चेत हे देखील समजून घेणे गरजेचे आहे की, आम्ही ज्या मुलांसाठी वेडे होत आहोत, की आपण यांना काय शिकवतोय, ते काय शिकत आहेत, यापेक्षा अधिक महत्वाचं आहे की, ते मानुस म्हणून कसे तयार होत आहेत. त्यांच्या मनात आपल्यासाठी काय शिजतंय. आपण त्यांच्या कोमल भावनांना कसे सांभाळत आहोत, याबाबतीत अधिक गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)