डिअर जिंदगी : वेळ मिळाला, तर घरी या भेटायला...!

आपण भेटण्याचा अर्थच हरवून बसलो आहोत. वाटतं की भेटणं नाही झालं, तरी चालेल, भेटतो त्यालाच, ज्याच्याशी 'काम' असतं. अशी कामं तर होत राहतात. पण यापूर्वी मिळवलेले मित्र दुरावतात. 

Updated: Jun 15, 2018, 07:49 AM IST
डिअर जिंदगी : वेळ मिळाला, तर घरी या भेटायला...! title=

दयाशंकर मिश्र : 'भेटणे' हे ताणतणाव घालवण्यासाठी सर्वात उपयोगी थेरपी आहे. 'भेट' नात्यांचा ऑक्सिजन आहे. भेटण्याने आपल्याला माणसं वाचता येतात. तुम्ही दुसऱ्याला वाचू शकतात. म्हणून भेटणं टाळू नका. ही मानवतेची ओळख आहे.

ते अचानकच येतात, जेव्हा येतात, तेव्हा भरपूर उत्साह, उमदारपणे भेटतात. स्वत:साठी त्यांना काहीच म्हणायचं नसतं. अडचणींचा कधीतरीच उल्लेख करतात. काही दिवसांपूर्वी आले तर विचारून टाकलं, कुणाच्या घरी जायचं असेल, तर मी सोडून देऊ, त्यांनी म्हटलं नाही, तसेही लोक आता घरी कमीच बोलवतात. त्यांच्या सांगण्यावरून वाटलं काही तरी दुखावलं आहे. मी सांगितलं जे काही झालं आहे, सांगून टाका.

त्यांनी सांगितलं, लहानपणीचा मित्र आहे, जेव्हाही बोलणं होतं, म्हणतो, याल तेव्हा जरूर भेटू, तर आल्यावर फोन केला. तरीही यावेळी नाही, नंतर अशी भेट होत नव्हती. यावेळी मी ठरवलं, सकाळी आठ वाजेलाच येतो. त्याने म्हटलं नाही. मग मी सांगितलं ठीक आहे, रात्री ८ वाजेला, येतो. त्याने म्हटलं, नाही, तू समजून का घेत नाही. भेटणे शक्य नाही. घरी येता येता रात्र होते. तेव्हा त्याला सांगितलं, अरे मित्रा बाहेरच भेटू, त्याने म्हटलं दिल्लीत भेटणे शक्य नाही. वेळच नसतो, तुझ्या शहरात आलो, तर भेटेन.

असंच सुरू असताना, लहानपणीचा, कॉलेजच्या मित्राला ते न भेटताच निघून गेले. कोणतीही नाराजी न दाखवता. कारण त्यांच्या यादीत खूप सारे मित्र आहेत, त्यांची गरज कमी आणि अपेक्षा तर नसल्यासारखीच.

प्रश्न त्यांचा भेटण्याचा किंवा न भेटण्याचा नाहीय. पण फक्त या गोष्टीचा आहे की, पण आपल्याला जे हवं असतं, ते आपण सांगू शकत नाही, आणि जे सांगतो, ते आपल्याला नको असतं. आपल्यातील बहुतेक लोक असे आहेत, ते मित्रांपासून यामुळे दूर नाहीत, पण यासाठी दूर आहेत की, ते भेटण्याला महत्व देत नाहीत. 

'भेटणे' हे तणाव घालवण्यासाठी रामबाण औषध आहे. नात्यांचं ऑक्सिजन देखील. भेटण्याने तुम्हाला वाचता येईल. तुम्ही दुसऱ्याला वाचू शकतात. यासाठी भेटणं टाळू नका. ही मानवता वाचवण्याची सुरूवात आहे.

आपण भेटण्याचा अर्थच विसरून गेलो आहोत. वाटतं की भेटणं नाही झालं तरी चालेल, भेटतो त्याला ज्याच्याशी 'काम' असतं. अशी कामं तर होत राहतात. पण यापूर्वी मिळवलेले मित्र लांब होत जातात. त्यांच्याशी संवेदनेचे तार अतूट होते, ते आता जुळू शकत नाहीत. संबंधांमध्ये एकदा लचक भरली, तर चालणं तसं शक्य आहे, पण कठीण होवून बसतं.

मोबाईल, व्हिडीओ चॅट आल्यानंतर भेटणं आणखी कठीण झालं आहे, कारण आपण प्रत्येक भेटीला काहीतरी मिळवू इच्छीतो, पण भेटू शकत नाही. सुखासाठी नाही भेटू शकत. हां पण सुख खरेदी करण्यासाठी भेटतो, व्यापाऱ्यांसारखं भेटतो. प्रवाशांसारखं, मित्रांसारखं नाही भेटत, त्यामुळे भेटण्याचं सुख आपल्यापासून दूर होत चाललं आहे.

यामुळे, पुन्हा हृदय, मेंदूला समजून सांगा की, घर, कुटूंब, मित्र, स्नेही जेवढ्यांना भेटता येईल, भेटा. घराचे दरवाजे हवेसाठीच नाही, तर दुसऱ्यांना भेटण्यासाठीही उघडा.

भेटण्याला महत्व न देणे, तुम्ही व्यस्त आहात, हे नाही, तर तुमच्या अडचणी सांगतं. काही व्यस्त लोकांच्या जवळ जावून पाहा, त्यांच्याजवळ वेळ कधीच नसतो, वेळ फक्त त्यांच्याकडे कमी असतो, जे मानव, मानवता, अभ्यास आणि चिंतनाशिवाय वेळ कुठेतरी' खर्च करत असतात. यासाठी जर कुणाला सतत वाटतंय की, त्यांच्याकडे वेळ नाही, तर या गोष्टीला गंभीरतेने घ्यायला हवं, की त्यांचा वेळ नेमका जातो कुठे?

वेळ या विषयावर नेल्सन मंडेला यांचा एक किस्सा आहे. एकदा मंडेला साहेबांनी आपल्या मित्राला खूप मोठं पत्र लिहिलं, त्याची शेवटची ओळ होती, 'वेळ कमी होता, म्हणून पत्र मोठं लिहिलं.'

सर्वात महत्वाची गंमतीशीर गोष्ट म्हणजे, वेळ कमी होता, आणि यामुळेच पत्र मोठं लिहिलं. कारण गोष्ट छोटी आणि थोडक्यात सांगण्यासाठी खूप विचार करून लिहावं लागतं. पण अनेक गोष्टी तर पटापट सांगता येतील.

मंडेला, गांधी आणि आयन्स्टाईन जगात सर्वात विधायक आणि आव्हानपूर्ण काम करत होते. त्यांच्याजवळ वेळेची कमतरता नव्हती, जीवनाविषयी, नात्यांविषयी त्यांची दृष्टी फार स्वच्छ होती, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ होता.

तर या रविवारी कुणाला भेटायला जात आहात, कुणाला भेटण्यासाठी बोलवत आहात, कधी सांगू नका, वेळ मिळाला तर घरी या कधी, नेहमी संधी मिळाली की बोलावणं पाठवा, आमंत्रण द्या, भेटा आणि आनंदी राहा!.

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)

(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)