डिअर जिंदगी : जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या

वेगळ होणं किंवा ठीक करून घेणं, हे वेगवेगळं वाटत असलं, पण ही एकच बाब आहे.

Updated: Aug 13, 2018, 12:07 PM IST
डिअर जिंदगी : जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या

दयाशंकर मिश्र : टायटॅनिक १४ एप्रिल १९१२ रोजी अटलांटिकमध्ये एका हिमनगाच्या टोकाला धडकून बुडलं. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. यावर पुढे जाऊन टायटॅनिक नावाचा सिनेमा बनवण्यात आला. टायटॅनिक ही त्या महिलेची कहाणी आहे, ज्या महिलेला त्या लाईफबोटमध्ये जागा मिळाली होती. या महिलेला जहाजावर जाऊन परतण्यासाठी ३ मिनिटांची वेळ देण्यात आली होती. जहाजातील आपल्या खोलीत जाऊन तिने महागडे, अमूल्य वस्तूंच्या जागी ३ संत्री उचलल्या, आणि ती लाईफबोटमध्ये बसली.

बुडणाऱ्या टायटॅनिकमधून बाहेर येण्याआधी या महिलेने ३ संत्री निवडल्या. कारण त्या घनघोर अंधारात त्या ३ संत्री तिला थोडा वेळ कामात येऊ शकल्या. पण असे निर्णय तेव्हाच का घेतले जाऊ शकतात, जेव्हा जीवन आणि मृत्यू यातलं अंतर स्पष्ट दिसत असेल. हे अशावेळी शक्य नाहीय का, जेव्हा असा परिस्थिती सामान्य असेल. अशावेळी जेव्हा नात्यातील पेच अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. तर अशावेळी निर्णय घेऊन आपण जीवनाला नव्या वळणावर घेऊन जाऊ.

डिअर जिंदगीला मिळत असलेल्या प्रतिसादात, ई-मेलमध्ये सर्वात जास्त अडचण न घेतल्या गेलेल्या, गुंतागुंतीच्या निर्णयावर आहेत.

आपल्या आनंदाला आपण दुसऱ्यांशी एवढं जास्त जोडून दिलं आहे की आपला सुख, भावना, या सर्व दुसऱ्यांच्या भरवशावर आहेत. यात कुणीही असू शकतं, मित्र, सखा, स्नेही, जीवनसाथी, किंवा आपल्यावर प्रेम करणारा दुसरा कुणीतरी.

जेव्हा आपल्या पतंगाचा दोरा आपण दुसऱ्याच्या हातात देतो, तेव्हा पतंग तर त्याच्याच हिशेबाने उडणार आहे. कधी कधी तुम्हाला हे देखील सांगितलं जात असेल, की मांजा गुंडाळलेली फिरकी तर तुमच्या हातात आहे, असं तुम्हाला वाटत असेल, पण राजा तोच असतो, ज्याच्या हातात पतंगाचा मांजा आहे. तोच पतंगाची दिशा ठरवतो, फिरकी ज्याच्या हातात आहे तो नाही.

यासाठी नात्यात समन्वयावर नजर असावी, पण या बाबतीत सतत सजग राहणे देखील आवश्यक आहे की, पतंगाचा दोरा एकतर्फी नियंत्रणात जायला नको. निर्णय एकतर्फी तर घेतला जात नाहीय ना. नात्यात दीर्घकाळ असं होत आलं आहे. तेथे तणाव, डिप्रेशनचं बीज हळूहळू आपली जमीन तयार करतं राहतं.

चला प्राधान्याने हे समजून घेऊ या...

पती-पत्नी एका दुसऱ्यासोबत आनंदी नाहीत, सुखी नाहीत. या एक दोन वर्षापासून. पण नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी ते काहीच करत नाहीत. हो मध्ये मध्ये ते नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी असं काही करतात, की जसं सरकार रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी डांबर भरतं.

हे व्यवस्थित लक्षात घ्या, रस्त्यातील खड्ड्यांमध्ये डांबर भरलं, म्हणजे रस्ता दुरूस्त झाला असं नाही. तसंच जीवनसाथीशी असलेल्या नात्याशी संबंधित असतं. दीर्घकाळापर्यंत एकमेकांप्रती स्नेह, प्रेम आणि नात्यात प्रेमाची गुंतवणूक आणि सहनशीलता ठेवल्याशिवाय नातं पुढे जाणं शक्य होत नाही.

आपण ज्या गोष्टींपासून सुखी नाहीत. या गोष्टींपासून आपण स्वत:ला दूर नेलं पाहिजे. किंवा अशा गोष्टी संवादाने ठिक केल्या पाहिजेत. या गोष्टी तुम्हाला खूप वेगवेगळ्या वाटतील, पण खरं तर या एकच आहेत.

जीवनाचा प्रवास मोठा आहे, पण अनंत नाही. यात खूप वेळ नक्कीच आहे, पण तो अमर्यादीत नाही. जीवनाला असमंजस, दुविधा आणि अर्निर्णित टप्प्यातून बाहेर काढा. जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या. निर्णय चुकीचे असू शकतात. पण ते कधी एवढे पण चुकीचे नकोत की, त्या निर्णयापासून भीती वाटेल.

निर्णय न घेणे, निर्णय टाळत राहणे, महत्वाची कामं पुढे ढकलणे, मानवासाठी तो मोठा अपराध आहे.

म्हणून भीतीच्या जगातून बाहेर या. जीवनात आपल्या निर्णयाचा सुगंधाचा दरवड असला पाहिजे.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)