डिअर जिंदगी : अनोखी 'उधारी' आणि मदतीचा 'बूमरँग'....

हा उपदेश नाही तर, दुसऱ्यासाठी 'काही तरी करण्याची कहाणी' आहे.

Updated: May 30, 2018, 03:21 PM IST
डिअर जिंदगी : अनोखी 'उधारी' आणि मदतीचा 'बूमरँग'.... title=

दयाशंकर मिश्र : ज्या लोकांनी दूरदर्शनवर मोगलीची मालिका जंगल बूक पाहिलं असेल, त्यांना सहज समजेल, बूमरँग कसं काम करतं. मोगली जवळ असं खेळणं होतं, जे त्याने हवेत फेकलं की ते त्याच्याचकडे परत येत होतं. असंही म्हणतात की बूमरँगचा शोध ऑस्ट्रेलियातील आदिवासींनी लावला होता, आणि असं मानलं जातं की आदिवासी याचा उपयोग मनोरंजन, शिकार आणि युद्धासाठी करत.

आज बूमरँगची आठवण यासाठी झाली कारण, एक दुसऱ्याची मदत, मानवतेची अशी कहाणी समोर आली, ज्यासाठी बूमरँग मला सर्वात महत्वाचं उदाहरण वाटलं. योगायोगाने आपण येथे, ज्या मानवाची आणि मानवतेबदद्ल बोलत आहोत. याचा इतिहास देखील हजारो वर्ष जुना आहे. असं म्हणतात की सर्वात जुना बूमरँग हा पोलंडच्या कारपेथियन पहाडात मिळाला आहे. तो बूमरँग २० हजार वर्ष जुना असेल असंही म्हटलं जातं.

आता मूळ कहाणीकडे जाऊ या...

दिल्ली-एनसीआरच्या इंदिरापुरममध्ये युवा दाम्पंत्य रोहित आणि रिंकी राहत होते. रोहित-रिंकी उत्तम डान्सर आहेत. व्यवस्थित डान्स शिकलेले. हे दाम्पत्य एका कॉलनीत जवळजवळ १० वर्षापासून राहत होते. सर्वजण हे त्यांच्याशी परिचित असतीलच हे तर जाहीर आहे. कॉलनी जरा थोडी मोठी आहे आणि त्यात यांची डान्स अकॅडमी एकमेव असल्याने, ते सर्वांना परिचित आहेत. 

काही वर्षांपूर्वी, एकेदिवशी, एका सफाई कर्मचाऱ्याने नेहमीप्रमाणे दरवाजा ठोठावला. त्या दिवशीही डस्टबिन बाहेर ठेवली, पण यावेळी काही तरी वेगळं होतं. कचरा उचलताना सज्जनने रोहितला सांगितलं, खूप घाबरत घाबरत, मला जरा आर्थिक मदत हवी आहे. त्या सफाई कर्मचाऱ्याला ७ हजार रूपये उधार हवे होते. खरं म्हणजे सफाई कर्मचाऱ्याला सोडा, इतर कुणालाही आपण उधार पैशांची मदत केव्हा करतो. असे अनेक लोक आहेत की सफाई कर्मचाऱ्याला ७ हजार देताना विचार करणार नाहीत, पण अशा लोकांची संख्या फार कमी आहे.

उधार पैशांची मदत, परत करण्याची क्षमता पाहून दिली जाते. ज्यांची रिटर्न व्हॅल्यू फार कमी आहे, अशा लोकांसाठी हे काही साधं सोपं नाही. वंचित लोकांसाठी आपण कधीच उदार नव्हतो. आमच्या सोसायटीत कचरा उचलणाऱऱ्या लोकांनी ५० ऐवजी ६० रूपये घेण्यास सुरूवात केली. तेव्हा कॉलनीतील काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत, १० रूपयांसाठी नकार घंटा दिली.

असं असताना एक माणूस कचरा उचलणाऱ्या व्यक्तीला ७ हजार रूपये उसनवार देतो, ही एख मोठी गोष्ट आहे. कारण कचरा उचलणाऱ्यांसाठी आपण घराचा दरवाजा जरूर उघडतो, पण त्याला आत बोलवत नाही. आपली मदत करणाऱ्यासोबत आपण असं करणे तसं योग्य नाही. कारण इतरांसाठी आपल्या घरात थो़डीफार तर जागा आहेच. पण कचरा उचलणाऱ्यासाठी आपल्या मनाचा द्वार तसं उघडं नाहीय. घराची सफाई आणि आपलं आरोग्य ज्याच्यामुळे चांगलं राहणार आहे, त्याच्यापासून आपला कोणता धोका असेल.

रोहित आणि रिंकी कचरावाल्याला उधार देतात. तो काही हफ्त्यांत त्यांचे पैसे परत करायला सुरूवात करतो. या दरम्यान या दाम्पत्याच्या मनात विचार येतो, की आता आपण स्वत:चं घर घेतलं पाहिजे. जेथे लोन शक्य आहे, पण बँकेला मार्जीन मनी हवी आहे. मार्जीन मनी ही कमीत कमी रक्कम आहे, जी आपल्याकडे पाहिजे, समजा जर तुम्हाला १०० रूपये कर्ज घ्यायचं असेल, तर निदान तुमच्याजवळ १५ रूपये तरी पाहिजेत. आता ही रक्कम कशी येणार यावर त्यांच्याजवळ राहणारा एक शेजारी मित्र त्यांना सल्ला देतो की, डान्सक्लासला तुमच्याकडे येणाऱ्या मुलांच्या आईवडिंलाकडे या विषयी बोला. तसं ते फारच कठीण होतं, कारण रक्कम १० लाखापेक्षा जास्त होती, तेव्हा काहींशी घाबरत घाबरत का असेना, ते बोलले, वेळ गेला पण रक्कम जमा झाली.

रोहित रिंकीला या बुधवारी आपलं घर मिळालं, योगायोगाने पाहा, ते जेव्हा घर रजिस्टर करण्यासाठी जात होते, तेव्हा त्या सफाई कर्मचाऱ्याने आपल्या उधारीचा शेवटचा हफ्ता दिला. हा पूर्ण किस्सा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे समजून घ्या. मात्र ही माझ्यासाठी जीवनातली सर्वात एक दुसऱ्यासाठी मदतीची, सदभावनेची, सहयोगाची प्रेरणादायी कहाणी आहे. ज्यात प्रेम, आत्मीयता, आणि एक दुसऱ्याला पुढे जाण्यासाठी केलेली खरी भावना आहे. आपल्यासाठी जगाची तशी तयारी आहे, आपल्यालाही वाटतं की जगाने आपल्याला मदत करावी. तर यापुढे कुणाला मदत करत असाल, तर याचा नक्की विचार करा, की त्या व्यक्तीची रिटर्न करण्याच्या व्हॅल्यू पेक्षाही, आपली मदत त्याच्या जीवनात कशी महत्वाची ठरेल.

(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )

(https://twitter.com/dayashankarmi)

(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)