दयाशंकर मिश्र : मी जेवढे आताचे प्रतिभावान, शिकलेल्या युवकांना ओळखतो, तो त्यांच्यात सर्वात आघाडीवर आहे. एक अशी मुलगी जिला आपल्या स्वप्नांवर खूप सारा विश्वास आहे, स्वप्न साकारण्याचं तिला वेड आहे. ती डिअर जिंदगीच्या वाचकांपैकी एक आहे, हे मला माहित नव्हतं. काल तिने मेसेंजरवर लिहिलं, ‘जब कोई बात बिगड़ जाए’ आणि ‘जजमेंटल और रूड’ वर लिहिलं. तिने म्हटलंय, आत्महत्या करणाऱ्यांबद्दल आपण थोडी सहानुभूती ठेवली पाहिजे.
त्यातील प्रतिक्रिया वाचून थोडा धक्का बसला, कारण ही मुलगी चांगली शिक्षित आहे. जगाच्या अंगणात चांगली फिरून आली आहे. तरी देखील आत्महत्येबद्दल हा दृष्टीकोन, पण याला समजावणे एवढे सोपे निश्चित नाही. जरा जगातील, तसेच भारतीय साहित्यावर नजर टाकली तर लक्षात येईल, येथे देखील आत्महत्येवर खूप सारं लिहिण्यात आलं आहे.
साहित्यात आत्महत्या रस्त्यातील बिंब सारखी आली आहे. कधी कधी तर यात एक प्रकारचा रोमान्स आहे. विशेष म्हणजे जीवनातील कष्टापासून मुक्तीचं सर्टिफिकेट देखील काहींनी देऊन टाकलं आहे. पण हा कुणासाठी तरी, मानवतेसाठी मोठा अपराध आहे.
हा आपल्या दु:खातून मुक्तीचा रस्ता नाही, पण जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी आयुष्यभर यातना देणारा हा निर्णय आहे. हे देखील आपण मानू या, की एक वेळेस तुम्हाला वाटेल, तुमच्यावर प्रेम करणारं कुणीच नाही, कुणाची तुम्हाला चिंता नाही, असं शकतं जगात तुम्हाला कुणीच प्रेमाच्या योग्य मानत नसेल.
एवढं सर्व झाल्यानंतरही आता जगायचं नाही, असा विचार कुठून आला.
आत्महत्येने काहीही सिद्ध होत नाही. हा हेकेखोरपणा खोटा आहे, की मला कुणीच जवळचं मानत नाही. नीट विचार केला तर लक्षात येईल, आत्महत्या करणारे लोक आपली अडचण कुणाला नीट सांगत नाहीत.
अशा अडचणी जास्तच जास्त अशा प्रकारच्या असतात.
१) बालपणातली अशी आठवण जी नेहमीच त्रासदायक ठरते. ही संगोपनापासून त्रास, खासगी जीवनातील अनुभव, नैराश्याची छाया असू शकते.
२) संबंधामधील छळ, नातं तुटल्यानंतरचा त्रास, आपल्या काही सिनेमांनी आणि पुस्तकांनी असं चित्र उभं केलं असतं, ज्यामुळे नाती तुटल्याने खोलवर जखम होते.
३) काही तर अशाच दु:खात बुडून जातात, एका मुलाने किंवा मुलीने मध्येच साथ सोडली, म्हणजे माझं जीवन उद्धवस्त झालं.
अरे हे काय झालं, जगातील सर्व स्त्री-पुरूष धोकेबाज झाले. काय आई-वडील, भाऊ-बहिण सारख्या नात्यांना अर्थच उरला नाही. हे सर्व नाती व्यर्थ झाली. हा एक प्रकारचा सिन्ड्रोम आहे. भुतकाळातील दु:खाला का कवटाळायचं, आपला आत्मा, सुख, स्नेह आणि आत्मियतेचा सप्लाय बंद करून टाकतो, म्हणून असा विचार सोडून द्या.
४) काहीच करायला नाहीय, हे असं लोकांच्या मनात येतं, जे कधीच संघर्षाच्या वनव्यातून गेले नाहीत. ज्यांच्या मागणीआधीच इच्छा पूर्ण झाल्या आहेत. असे लोक जेवणात मीठ जास्त होतं, तेवढा सुद्धा तणाव सहन करू शकत नाहीत. स्वत:ला सिद्ध करण्याची धमक, जीवनात इंधनासारखी काम करते.
५) आपलं असं काम जे जगाच्या नजरेत येईल आणि आपली मोठी बदनामी होईल. कारण तुम्ही स्वत:ला देवापेक्षा मोठे समजून घेतात. याचा अर्थ असा देखील होतो की, जगात तुम्ही तुमची नकली प्रतिमा तयार केली आहे. कारण तुमची नकली प्रतिमा पुसली जाईल. या भीतीने तुम्ही मृत्यूची योजना आखतात.
अशा लोकांसाठी गांधींजींचं सत्याचे प्रयोग हे पुस्तक अचूक औषध आहे. एवढं स्वस्त आणि लहान पुस्तक जगात नसेल, जे आपल्या मनाला लागलेलं जाळ साफ करतो.
आपल्याला आत्महत्येच्या विचाराविरोधात संघर्ष करायला हवा. फक्त सहानुभूतीचं नाही, तर आत्महत्या करणाऱ्यांविषयी उदारता आपल्या समाजात सृजनात्मक नाही बनवू शकत. हो आपल्याला स्वत:ला एवढं उदार बनायचं आहे की, आपली मूलं, मित्र, साथीदार यांना आपण कोणत्याही परिस्थिती स्वीकारा. त्यांची चूक भूल, अपयश स्वीकारा. यामुळे आनंदी जीवनाचा विचार मोठाच होत जाणार आहे.
ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com
पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4,
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत) (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)