डिअर जिंदगी : मुलांना रस्ता नाही, यशाचा मार्ग निवडण्यात मदत करा!

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग ज्यांना आपण 'जुरासिक पार्क'साठी आठवणीत ठेवतो, ते आपल्या भाषणात नेहमी एक मजेदार किस्सा सांगत असत.

Updated: Jan 15, 2019, 01:28 PM IST
डिअर जिंदगी : मुलांना रस्ता नाही, यशाचा मार्ग निवडण्यात मदत करा!

दयाशंकर मिश्र : मुलांचं पहिल्यांदा जेव्हा शाळेत नाव टाकलं जातं, तेव्हापासून त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं लादण्यात येतं. मुलांमधील प्रतिभा ओळखण्यासाठी एवढ्या मोठ्या गोष्टींचा बाजार सजलेला आहे की, मुलं प्रत्येक क्षणी आपला निर्णय बदलवतात.

मुलांना जोपर्यंत स्वत:बद्दल कळायला लागतं, तोपर्यंत पालक त्याच्या करिअरची दुसरी दिशा निवडून मोकळे होतात. शाळेतील शिक्षक त्याच्या आत आणखी वेगळं काहीतरी शोधतात, पाहतात. तर दुसरीकडे टीव्ही, इंटरनेट त्याच्या आईवडिलांना वेगवेगळे सल्ले देत राहतात. यानंतर 'घरचं झालं थोडं आणि व्याह्याने पाठवलं घोडं', असं असताना, नातेवाईक आणि शेजारीही अधिकारवाणीने सल्ले द्यायला लागतात.

असं होण्यामागचं कारण आहे की, मुलांचं करिअर 'डिझाईन' करण्यासाठी आपण आपली भूमिका पार पाडू इच्छितो. आपण त्यांचं इंट्यूशन (अंतर्ज्ञान, सहजबोध) वर विश्वास ठेवण्याच्या जागी, आपल्याच मनाचं ऐकण्यावर अधिक भर देत असतो. यामुळेच मुलांच्या निर्णयात आपला नको तो हस्तक्षेप असतो.

पालक म्हणून अजूनही आपण मुलांना आपली संपत्ती समजण्याच्या पलीकडे विचार करीत नाहीत. यामुळेच आपण त्यांना 'एक चौकटीत आणि अकले'च्या हिशेबाने बसवण्याचा प्रयत्न करतो. 

आपण त्यांना त्यांच्या मनात काय आहे, ते काय करू इच्छीतात, किंवा चांगलं करू शकतात याचा विचार न करता, आपल्याच ज्ञानावर आधारीत रस्त्यावर त्यांना ओढण्याचा प्रयत्न होतो. आपल्याला हे देखील माहित असतं की, या कामात आपली भूमिका एखाद्या काजव्याएवढीच असते. तरी देखील आपण स्वत:ला या भूमिकेपासून दूर ठेवण्याचा लोभ सोडू शकत नाहीत.

'डिअर जिंदगी'ला बेंगळुरूहून गौरा ठाकूरने लिहून पाठवलंय, मुलांनी त्यांचा सल्ला बाजूला ठेवला, सल्ला इंजीनिअरिंग करण्याचा होता, त्यांनी एमबीए आणि स्टार्टअप निवडलं. पहिल्यांदा तर तिला आणि तिच्या पतीला याबद्दल खूप वाईट वाटलं. पण काही दिवसानंतर आपल्या मुलांनी जे ठरवलं आहे, त्यासाठीच्या भावना, आणि मेहनत त्यांना दिसून आली, आणि पालक म्हणून आपण काहीतरी चुकीची भूमिका घेत होतो, असं त्यांच्या लक्षात आलं.

गौरा भाग्यवान, जागरूक आणि संवदेनशील असल्याने, ती हे समजू शकते. कारण आपल्या देशात असे पालक मोठ्या प्रमाणात आहेत की, जे मुलांना चुकीचं सिद्ध करण्यात संपूर्ण आयुष्य घालवतात. मुलांचं योग्य होतं, हे जरी सिद्ध झालं तरी, त्यांच्या सोबत निर्णयाच्या जागी, आयुष्यभर निर्णयाची समीक्षा करत बसतात.

यासाठी हे महत्वाचं आहे की, मुलांना तेच करायला सांगा, ज्याकडे त्यांचा कल असेल, आवड असेल. याठिकाणी आवड आणि ग्लॅमरच्या अंतराला समजून घेण्याची गरज आहे. 

उदाहरण म्हणून एका मुलाची बातमी, आणि समाजाविषयी काहीतरी करण्याची आवड. तसेच लिहण्याची, वाचण्याची आवड असेल तर मीडिया त्याच्यासाठी एक योग्य जागा असू शकते. पण ज्याला टीव्ही अँकरला टीव्हीवर पाहून टीव्हीमध्ये येण्याची इच्छा असेल, तर हा ग्लॅमर डोक्यात घेऊन घेतलेला निर्णय आहे.

पालकाची भूमिका एवढीच असली पाहिजे की, त्यांनी आवड आणि ग्लॅमरमधील फरक नीट सांगितला पाहिजे. आईवडील जे आहेत, जसे आहेत, त्या आधारावर मुलांचा रस्ता निवडला जायला नको. त्यांना त्यांची वाट निवडण्याचा महत्वाचा अधिकार मिळाला पाहिजे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग ज्यांना आपण 'जुरासिक पार्क'साठी आठवणीत ठेवतो, ते आपल्या भाषणात नेहमी एक मजेदार किस्सा सांगत असत. ते म्हणायचे कॉलेजमधून बाहेर पडायला मला ३७ वर्ष लागली. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे वेडे होतात, आशावादी होतात, तर तुमच्यासोबतही असंच होवू शकतं.

खरं तर स्पीलबर्ग जेव्हा कॉलेजमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांच्या आवडीचं काम एका स्टुडिओत मिळालं. तेव्हा त्यांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की, जर चित्रपटात मी करिअर करू शकलो नाही, तर पुन्हा कॉलेजला परतेन. स्पीलबर्गने सिनेमाच्या बाबतीत जे काही मिळवलं, त्याबाबतीत आता कुणाच्या दाखल्याची गरज नाही. पण त्यानंतरही ५० वर्षांनी त्यांनी, आपली कॉलेजची डिग्री मिळवली. कारण आपल्या पालकांना दिलेला शब्द पाळायचा होता.

स्पीलबर्ग म्हणायचे, 'आपलं अंतर्ज्ञान, हे आपल्या अंतरात्‍मापेक्षा वेगळं असतं, तुम्हाला हे काम केलं पाहिजे.. तर इंट्यूशन म्हणतं, ये ते काम आहे, जे तू करू शकतो. आपण त्याच आवाजाचं ऐका, ज्यात म्हटलंय, तुम्ही हे करू शकतात.

या, स्वत:शी एक निश्चिय करू या. मुलांना आपल्याला वाटतंय, त्यापेक्षा त्यांना वाटतंय, त्या योग्य वाटेवर चालण्यास मदत करू या. ज्यांना त्यांचं मन सहज रस्ता निवडण्याचा सल्ला देत असेल.

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)