डिअर जिंदगी : सत्‍याचे प्रयोग- २

जर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.

Updated: Sep 11, 2018, 12:27 AM IST
डिअर जिंदगी : सत्‍याचे प्रयोग- २

दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगी, सत्याचे प्रयोग १ मध्ये तुम्ही वाचलं असेल की, पाचवीत पोहचण्याआधी माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. कारण मी मध्य प्रदेशातील बघेलखंड रीवामध्ये मी लहानाचा मोठा झालो आहे. जेथे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बालविवाह सर्रास होत होते.

हे अशा वेळी होत होतं, जेव्हा गावात, तहसिलमध्ये योग्य त्या संख्येत शिक्षक, डॉक्टर आणि इंजीनिअर होते. मात्र शैक्षणिक दृष्टीकोनाशी कोणताही संबंध नव्हता. हेच कारण होतं, की शिक्षित लोकं ही प्रथा, परंपरेचं पालन संमोहित झाल्यासारखे करत होते.

मी देखील या परंपरेला छेद दिला नसता, जर शाळेत वाचनात महात्मा गांधी यांची संपूर्ण कहाणी मी वाचली नसती. मला गांधीजींच्या शब्दामुळे सामर्थ्य मिळालं की, कसं आपण आपल्या योग्य भूमिकेवर कायम राहिलं पाहिजे.

जर तुम्हाला सत्यबोध असेल, तर त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो तुमच्या अंतर्मनातून येईल. जगाच्या दृष्टीकोनाची चिंता करू नका, फक्त तुमचा निश्चिय आणि निवडीवर कायम राहा.

आज माझ्यासाठी तणाव, एकटेपणा, नैराश्य सारख्या गोष्टींवर, त्या तुलनेने बोलणं अधिक सुलभ झालं आहे. पण पाचवीत विद्यार्थी जीवनात मी एका अशा सामाजिक समस्येचा सामना करत होतो. ज्याविषयी माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तींची समजूत काढावी लागत होती, जे माझ्यापेक्षा तसे मोठे आणि समझदार होते. पण समजून घ्यायला कुणीच तयार नव्हतं.

येथूनच मला ३ गोष्टींची समज स्पष्टपणे मिळाली...

हे गरजेचं नाही की, तुम्ही (मोठे) नेहमीच बरोबर असावेत. पण काही गोष्टी मोठ्यांना अनेक वेळा समजवता येत नाहीत, जेवढ्या त्या लहान मुलांना समजावणं कठीण असतं तेवढंच.

साक्षर होण्याचा अर्थ शिकलेला-लिहून मोठा झालेला असा नाही होत. आपल्याकडे जास्तच जास्त लोक साक्षर आहेत. पण ते शिकलेले- लिहिलेले नाहीत. कारण त्यांच्यात वैज्ञानिक विचार आणि समजुतदारपणा कमी आहे. लहान मुलांची सहज बुद्धी मूळ समस्येला, मोठ्यांपेक्षा लवकर पकडते. राजा राममोहन राय, ईश्‍वरचंद विद्यासागर आणि आर्य समाज के संस्‍थापक दयानंद सरस्‍वती यांचं उदाहरण सांगता येईल.

माझं शिक्षण भोपाळच्या एका सर्वसामान्य शाळेत होत होतं, माझ्याजवळ मित्र, शिक्षक, नातेवाईक यांचा कोणताही असा समूह नव्हता, जो बाल विवाहाला थांबवण्याची तयारी दाखवू शकेल. एक व्यक्तीही मला याविषयी समजून घेणारा नव्हता, माझा सामना अशा ‘सोशल सिंड्रोम’सोबत होता. ज्यात माझ्या आजूबाजूचा समाज होता.

घाबरलेल्या, हिरमुसलेल्या, चिंतेत असलेल्या मुलाचं एकटेपण घातक असतं. कोणत्याही मोठ्या नातेवाईकासोबत मी बालविवाहाविषयी बोलत होतो, त्यात कोणताही अडचण दिसत नव्हती. आमच्या संपूर्ण शिक्षित परिवारात सर्वजण कमी वयात लग्न करा. या गोष्टींचे खंदे समर्थक होते.

पुन्हा मला गांधीजी शाळेच्या पुस्तकात भेटले. त्याचं जीवन आमच्या सहायक वाचनात सुंदरपणे ऐकण्याची संधी मिळाली. शिवाय या वाचनाने माझ्या आयुष्यातील दिशा बदलून गेली.

मी विरोधाला घाबरणं सोडून दिलं. स्वत:ला यांच्यापासून वाचवण्यासाठी मी, मेंदूत तर्क आणि प्रबळ विचारांची मजबूत भिंत बांधली. पुस्तक वाचन, पेपर वाचन, व्याख्यान ऐकणे या रस्त्याला मी गेलो. दहावीचा विद्यार्थी होण्याआधी, भारताचे कमीत कमी ३ पंतप्रधान, अनेक शंकराचार्य, धार्मिक टिकाकार, आणि मदर टेरेसा यांच्या सारख्या अद्भूत समाजसेवकांच्या सभेत मी जाऊन आलो होतो. दिवसा कमीत कमी ३ ते २ न्यूज पेपर वाचणे सामान्य होतं.

आठवी ते दहावीपर्यंत सर्व रिझल्ट शाळा, समाज वाह वा करेल, असे नव्हते. पण या सर्व गोष्टीतून मला निराशा, डिप्रेशनपासून वाचण्यात महत्वाच्या ठरल्या.

गांधींच्या सत्याच्या दृष्टीकोनाने मला आपल्या सत्याच्या भूमिकेवर कायम राहण्याची अनोखी शक्ती दिली. अकरावीपासून शाळा आणि समाजाला हवं असलेलं शिक्षणाची गाडी रूळावर आली. बाल विवाह-कमी वयात लग्न याविरोधात लढण्याचा माझा विचार परिपक्व होत गेला. पण यानंतरही मला तणाव, निराशेकडे नेण्याचा प्रयत्न होता.

पण गांधीजी सतत आशा, अपेक्षाचा दाखवत होते. ते शिकवत होते की, चुकीच्या गोष्टी सहन करण्यासोबतंच त्यांच्यावर न बोलणे, मौन राहणे देखील चुकीचं आहे.

या विचारांची किंमत मला दुसऱ्यांसोबत हो...नं मिळवण्याच्या रूपात, नेहमी-नेहमी नोकरी बदलण्याच्या रूपात चुकवावी लागली. पण मी नेहमी नवा रस्ता पर्याय म्हणून निवडला. पण मी विनम्रतेने सांगू इच्छीतो, वाटा तुमच्याकडे नेहमीच उपलब्ध असतात. फक्त त्यांचा सन्मान करा. दुसऱ्यांनी बनलेल्या रस्त्यावर चालण्यापेक्षा फार महत्वाचं आहे, आपल्या विचारांवर चालण्याचं धैर्य असावं.

'डिअर जिंदगी'ची ही आवृत्ती तुम्हाला जरा आत्मकथेचा अनुभव देणारी ठरू शकते, पण येथे या सर्व गोष्टींचा उल्लेख केवळ यासाठी आहे की, यात वाचक हा प्रश्न नेहमी लावून धरतात की, लिहीणे, वाचणे सहज आहे, पण तसं जीवन नाही. तणाव, उदासपणा यातून निघणे कठीण नाही.

मी विनम्रपणे आणि पूर्ण जबाबदारीने सांगू इच्छितो, स्वत:ला आतल्या आत मजबूत करा, सर्व बळ तेथूनच येतं.
तुमच्या मनापासून म्हणा...

'डराओ, सताओ नहीं, 
कान खोलकर सुन लो,
इतना मुश्किल भी नहीं है, जीना'

ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com

पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)

(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)