डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!

ही पोस्ट अशा मुलांसाठी नाही, ज्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले आहेत. अशा मुलांची वाह..व्वा! करण्यासाठी तर समाज, सतत उत्साही असतो. हे त्यांच्यासाठीही नाही, ज्यांची नजर आणि खांदे झुकलेले आहेत, ज्यांना स्वत:ला आतल्या आत तुटल्या सारखं वाटतंय.

Updated: May 30, 2018, 03:49 PM IST
डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत! title=

दयाशंकर मिश्र : मोबाईल, फेसबुक आणि न्यूजपेपर्सवर अशा मुलांचे फोटो झळकतात, ज्यांनी बारावीच्या परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. अशा मुलांवर शुभेच्छांचा ओघ येत आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या समाजात, त्यांचं जास्तच जास्त वेळेस भलं नाही, तर नुकसानच वाट्याला येतं.

दहावी-बारावीत चमकलेल्या मुलापेक्षा, तो मुलगा कसा काय सर्वोत्तम असू शकतो?, कारण हा मुलगा यशस्वी मुलांप्रमाणे, ठरलेल्या वेळेत, घोकमपट्टी केलेल्या, रटवलेल्या गोष्टी नीट लिहू शकला नाही. हे समजणं तसं फारच कठीण आहे की, कमी मार्क्स मिळालेला मुलगा, त्या मुलापेक्षा कमी हुशार, असं कसं ठरवलं जाऊ शकतं?, ही बाब भारतातच नाही, तर जगभरातील तमाम देश, या गोष्टीची ग्वाही देतात की, विज्ञान, शोध, राजकारण, कला, सिनेमा यांच्यात कमी मार्क्स मिळवणाऱ्यांचं योगदान जेवढं आहे, तेवढं दुसरं कुणाचंच नाही.

नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्य़ांची यादी ही साक्ष आहे की, मुलं फक्त शाळेत नापास होतात. अडचण शाळेच्या परीक्षा पद्धतीत आहे. त्या मुलांमध्ये अडचण नाही, ज्यांना मुलांना कमी मार्क्स मिळतात. यात महत्वाचं म्हणजे, ही पोस्ट अशा मुलांसाठी नाही, ज्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवले आहेत. अशा मुलांची वाह..व्वा! करण्यासाठी तर समाज, सतत उत्साही असतो. हे त्यांच्यासाठीही नाही, ज्यांची नजर आणि खांदे झुकलेले आहेत, ज्यांना स्वत:ला आतल्या आत तुटल्या सारखं वाटतंय.
 
माझे पत्रकार मित्र पीयुष बबेले यांनी किती सुंदर लिहिलं आहे, 'CBSEचा रिझल्ट आला, अनेक मुलांनी खूप मार्क्स मिळवले, आणि अनेक मुलांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले. ज्यांचे मार्क्स कमी आले, मला अपेक्षा अशाच लोकांकडून आहे. अपेक्षा मला त्यांच्याकडूनच आहे. कारण मागील ७० वर्षात टॉपर्सने देशासाठी काय केलं. याबाबतीत कुणाला काहीच माहित नाही. हो, टॉपर्सने स्वत:साठी खूप काही केलं. हे मी नक्कीच जाणतो, म्हणून ज्यांना कमी मार्क्स मिळाले, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, देशाला आणि समाजाला देखील त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत'.

या गोष्टीची थेअरी समजून घेऊ नका. याला असंही पाहून चालणार नाही की, अरे याच्यातून काहीच होणार नाही. जीवनाची शर्यत तशी खूपच क्रूर आहे. जीवघेण्या स्पर्धेत मुलगा कसा टिकणार. असं म्हणून आपण मानव आणि मानवता या दोन्ही गोष्टींवर संशयचा ठपका ठेवतो. दहावी आणि बारावीची परीक्षा, तशी काही मैलाचा दगड नाही. ही आमची जुनी, सडलेल्या कुजलेल्या सिस्टमची कमतरता आहे, कारण मुलांमधील प्रतिभा समोर आणण्याचा दुसरा पर्याय मिळालेला नाही.

यासाठी सरकार, समाज आणि शाळा आपले जुने विचार अजून बदलू शकतं नाहीत. आपण अजूनही जगातील अशा देशांचा विचार केलेला नाही, ज्या देशांमध्ये मुलगा सात वर्षाचा झाल्यानंतर शाळेत न पाठवण्याचा नियम अजूनही कायम आहे. आपण अमेरिकेतील अशा महाविद्यालंयाबद्दल डोळे आणि कान बंद केले आहेत, ज्यात सर्वाधिक वेळ याच्यावर देण्यात आला आहे की, तुम्हाला काय करायला आवडतं. बिनकामाच्या गोष्टीत वेळ घालवू नका, स्वत:ला समजून घ्य़ा.

इंग्रजांच्या नावाने कितीही बोटं मोडा की, ते आपल्याला क्लर्क बनवून गेले. पण त्यांना जाऊन तर दशकं झाली, पिढ्यानं पिढ्या आल्या आणि गेल्या. पण शाळा तशाच आहेत. शिक्षणाची रेल्वे त्याच रूळांवर धावते आहे, जे रूळ इंग्रज टाकून गेले होते. आपल्या टागौरांच्या विश्व भारतीचा मार्ग आपण निवडला नाही. शिक्षणाच्या बाबतीत महात्मा गांधी, बुद्ध आणि आईन्स्टाईनचे विचार नाही ऐकले. आपण मुलांचा साचा बनवण्या मागे लागलो आहोत.

आपण कुंडीत रोपं लावून पर्यावरण नाही वाचवू शकत, यासाठी जंगल पाहिजे, यासाठी जंगल पाहिजे. यासाठीच वैज्ञानिक विचार, समजणारा देश मोठ्यांनी नाही बनणार, त्याचं बीज मुलांमध्ये रोवलं गेलं पाहिजे. यासाठी मुलांची मार्कशीटशी तुलना करणं बंद केलं पाहिजे. हा आपल्याचा विरोधात केला गेलेला मोठा अन्याय आहे.

यासाठी मार्क्स मिळवण्याच्या स्पर्धेत मुलं मागे पडून आत्महत्येता मार्ग निवडतात, जरा सांभाळा. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांनाही सांगा, 'मुलं अयशस्वी होत नाही, शाळा अयशस्वी होते, मुलं नेहमी आपल्या स्वप्नांपर्यंत पोहचतात, फक्त आपण त्यांना समजावून सांगावं, तिथं पर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग कोणता आहे', हे आपलंच काम आहे, मुलांचं नाही.

(लेखक 'झी न्यूज'चे डिजिटल एडिटर आहेत )

(https://twitter.com/dayashankarmi)

(तुमचे प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा : https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)