'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'

बड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.

Jaywant Patil Updated: Mar 15, 2018, 07:26 PM IST
'तहान लागली आणि त्याने इंटरनेटवर विहिरच खोदली'

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : जॉन ओरिंगरला सॉफ्टवेअरच्या कामासाठी फोटो हवे होते, पण इंटरनेटवर पाहिजे ते फोटो त्याला मिळाले नाहीत, म्हणून त्याने फोटो स्टॉक करणारी शटरस्टॉक डॉट कॉमच उभारली, म्हणजे 'तहान लागली आणि त्याने विहिरच खोदली'. 

बड्या उद्योगपतींनीच उद्योग उभारायचे, ही मक्तेदारी इंटरनेटच्या युगाने संपवून टाकली आहे.  इंटरनेवर तुमच्या मनात आलेली एक साधी कल्पनाही तुम्हाला अब्जपती बनवू शकते, काहीशी अशीच आहे 'शटरस्टॉक डॉट कॉम'ची आणि संस्थापक जॉन ओरिंगर यांची कहाणी.

शटरस्टॉकचा जन्म

सर्च इंजीनवर एखादा चांगला फोटो शोधायचा असेल, तर शटरस्टॉक शिवाय पर्याय नसतो, 'शरटस्टॉक'ची सेवा विकत घेणाऱ्यांसाठी ही सुविधा महत्वाची ठरते. फोटोंचा स्टॉक करणारी ही स्टॉक फोटो वेबसाइट जॉन ओरिंगर यांनी सुरू केली.

शटरस्टॉकचा संस्थापक जॉन ओरिंगर हा अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या सिलिकॉन व्हॅलीतला पहिला अब्जपती आहे.

अपयश पचवण्याची शक्ती पाहिजे

शरटरस्टॉक सुरू करण्याआधी जॉन ओरिंगर यांनी दहा कंपन्या सुरू केल्या, पण त्याला अपयश आलं, यावर ओरिंगर म्हणतात, 'मी अनेक वेळा अपयशी झालो , पण पुन्हा एकदा मी तयार होतो, अपयश पचवण्यासाठी'.

मात्र शेअरमार्केटमध्ये अपयश

शटरस्टॉक ऑक्टोबर २०१२ मध्ये स्टॉक मार्केटला लिस्टेड करण्यात आली, पण स्टॉक मार्केटमध्ये अपयशी ठरली, मात्र या कंपनीकडे २.८ कोटीपेक्षा जास्त फोटो, व्हिडीओ आणि इलस्ट्रेशंस आहेत.

संस्थापकाची संपत्ती १.०५ अब्ज डॉलरवर

ओरिंगर यांच्याकडे या कंपनीचे ५५ टक्के शेअर्स आहेत, ओरिंगरची एकूण संपत्ती १.०५ अब्ज डॉलरच्याही वर आहे. ओरिंगर आता ३९ वर्षांचे आहेत, त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय म्हणून ही कंपनी सुरू केली नव्हती.

इंटरनेट ब्राऊजर्सवर अचानकपणे नको असलेली विंडो उघडते. हा त्रास बंद करण्यासाठी, ओरिंगर हे २००३ मध्ये यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करत होते.

अशी सुचली कल्पना

या विषयी बोलतांना ओरिंगर म्हणतात, मी या वेळी सॉफ्टवेअर बनवतांना मला काही सर्वसाधारण वस्तुंचे फोटो हवे होते, पण असे फोटो मिळवणं सोपं नव्हतं. त्यावेळेस काही बोटावर मोजता येतील एवढ्या कंपन्या होत्या, त्यांनी काही जेनेरिक प्रतिमा बनवण्यात पुढाकार घेतला होता.

स्वस्तात सेवा दिली

हे सर्व फोटो अथवा जेनेरिक प्रतिमा या न्यूज एजन्सीज आणि गॅट्टी इमेजेस सारख्या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आल्या होत्या. या कंपन्यांची सर्व्हिसही महागळी होती आणि लहान कंपन्यांच्या आवाक्याबाहेर हा दर होता.

ओरिंगर यांच्याकडे काही डॉलर होते, त्यांच्याजवळ फोटोग्राफीचा काहीही अनुभव नव्हता, ओरिंगर यांनी एक चांगला कॅमेरा खरेदी केला आणि काही सामान्या वस्तुंचे फोटो काढण्यास सुरूवात केली.

शहरं आणि जगातील बहुतांश भाग फिरला

ओरिंगर यांनी त्यासाठी न्यूयॉर्क शहरातील रस्ते धुंडाळून काढले, जगभर सफरी केल्या. पर्यटक काही विशिष्ट गोष्टींचे फोटो काढत असत. मात्र ओरिंगर काही सामान्य आणि जेनेरिक वाटतील अशा प्रतिमा कॅमेऱ्यात कैद करत होते.

२५ ते ३० हजार फोटो काढले

ओरिंगर यांनी पहिल्या वर्षी २५ ते ३० हजार फोटो काढले आणि शटरस्टॉक वेबसाईटवर अपलोड केले आणि शटरस्टॉकचा जन्म झाला. सुरूवातीला जाहिरातीच्या प्रचारासाठी त्यांनी गूगल ऍडवर्ल्डसारख्या स्वस्त जाहिरातींची मदत घेतली.

ओरिंगर म्हणतो, हे सर्व करतांना टर्निंग पॉईंट आला, कारण लोकांकडून फोटोंची मागणी एवढी वाढली की, मी फोटो पुरवण्यात अपूर्ण पडू लागलो. शटरस्टॉक ही कंपनी कधी सुरू झाली आणि या कंपनीचं कामकाज माझ्याचं घरातून कधी सुरू झालं हे मला कळलंही नाही.

घर झालं सिलिकॉन व्हॅली

तंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या कंपन्यांप्रमाणे शटरस्टॉक सुरू करण्यासाठी मला भांडवल जमा करण्याची गरज पडली नाही. मी काही हजार खर्च करून कॅमेरा खरेदी केला होता आणि एक छोटसं ऑफिस मी भाड्याने घेतलं.

सुरूवातीला हे सर्व मी एकट्याने केलं, मी स्वत: फोटो काढत होतो आणि सर्व फोन कॉल्सही मी स्वत: घेत होतो.

कॉल सेटरचे फोन स्वत: घेतले, म्हणून अडचणी समजल्या

ओरिंगर यांनी नेहमी ग्राहकांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या, त्यातील कमीपणा गंभीरपणे घेतला. मग त्यांनी आपल्या कंपनीत कर्मचाऱ्यांची भरती केली. मात्र त्यांनी फोटोग्राफर्स नव्हे तर इंजिनिअर्स कामावर घेतले. मी सर्व काही माझ्या पद्धतीने करू इच्छीत होतो, माझं लक्ष्य फायदा मिळवणं होतं, या विचाराचाच मला फायदा झाला, असं ओरिंगर म्हणतात.

फायदा वाढत राहिला

शरटरस्टॉक १५० देशांत साडे सात लाख ग्राहकांना सेवा देणारी कंपनी आहे. शटरस्टॉकने मागील वर्षी 4.75 कोटी निव्वळ नफा कमवला, तो त्या मागील वर्षाच्या तुलनेने ११७ टक्के होता.

डिजिटल फोटोंचा सध्याचा बाजार ४ अब्ज डॉलर्सचा आहे, आणि हा 2016 मध्ये सहा अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला.

तरीही 'डाऊन टू अर्थ'

सध्या ४० हजार पेक्षा जास्त फोटोग्राफर्स आपले फोटो आणि व्हिडीओ शटरस्टॉकवर पाठवतात, अशा सर्व फोटोग्राफर्सना कंपनीने आतापर्यंत १५ कोटी डॉलर रूपये मोबदल्यात दिले आहेत. ओरिंगर हे अब्जपती असले तरी विनम्र असल्याचं सांगण्यात येतं, ओरिंगर अजूनही जमीनीवर आहेत.