सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिदुत्व आणि राममंदिराबाबत मोठं विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.

वनिता कांबळे | Updated: Dec 20, 2024, 10:02 PM IST
सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिदुत्व आणि राममंदिराबाबत मोठं विधान title=

Mohan Bhagwat on Ram Mandir : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिदुत्व आणि राममंदिराबाबत एक मोठं वक्तव्य केलंय. राम मंदिराची निर्मिती व्हावं असं हिंदूंना वाटतं. ते हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. मात्र, राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोण हिंदूंचा नेता होत नाही, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. त्यामुळे मोहन भागवतांचा रोख नक्की कुणाकडे आहे, असा सवाल केला जात आहे.

भागवतांच्या या वक्तव्यावरून खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरएसएसनंच भाजपला सत्तेत बसवल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. तर मोहन भागवतांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही तिरकस प्रतिक्रिया दिलीय.  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. मोहन भागवत काय चुकीचं बोलले असा प्रतिसवाल दानवेंनी केलाय.

आरएसएस ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे आरएसएसचा शब्द अंतिम असतो. हिंदुत्वाच्या मुद्यावरून आता पुन्हा एकदा मोहन भागवतांनी कान टोचले आहेत. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा सवाल केला जात आहे.
मनुष्य व्हायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे. विचारांची दिशा नराचा नारायण घडवणारी असावी नराचा नराधम घडवणारी नसावी असं पुण्यात मोहन भागवत यांनी म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यात लोकसेवा इ स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार यांनी संघाच्या बौद्धीकाला जाणं टाळलं 

नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंस्वेक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांनी हजेरी लावली. संघाकडून महायुतीच्या आमदारांचं बौद्धीक घेण्यात आलं..  मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या बौद्धिक वर्गाला जाणं टाळल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे संघाचं बौद्धिक सुरू होतं तर दुसरीकडे अजित पवार त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी कार्यकर्त्यांचा भेटीगाठी घेत होते. गेल्या वर्षीही अजित पवार यांनी संघाच्या बौद्धीकाला जाणं टाळलं होतं. अजित पवार त्यांचे मंत्री आणि आमदारांनी संघाच्या बौद्धिकाकडे पाठ फिरवली असली तरी राष्ट्रवादीचे दोन आमदार राजू कारमोरे आणि राजकुमार बडोले यांनी या बौद्धिक वर्गाला हजेरी लावली. आरएसएसच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे  सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते.. महायुतीच्या सरकारमध्ये आल्यानंतर अजितदादांनी धर्मनिरपेक्ष, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेवर कायम राहणार असल्याचं म्हटलं होतं.. त्यामुळे अजित पवार थेट संघाचे कार्यक्रम टाळत असल्याचं पाहायला मिळतंय.