IPL 2019:'कट ऍन्ड बोल्ड' होऊनही धोनी ठरला नॉट आउट !

...म्हणूनच चेन्नईनच्या संघाला हा सामना जिंकता आला.

Updated: Apr 1, 2019, 02:35 PM IST
IPL 2019:'कट ऍन्ड बोल्ड' होऊनही धोनी ठरला नॉट आउट ! title=
Pic Courtesy : PTI

नवी दिल्ली: आयपीएल १२वे हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल वर ८ धावांनी मात केली. राजस्थान रॉयच्या संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयलने घेतलेला निर्णय यशस्वी होताना दिसत होता. चेन्नई सुपर किंग्जने २७ धावांवर ३ विकेट गमवले. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा धावपट्टी वर आला. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी जोफ्रा आर्चर कडे धाव घेतली. सहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर जोफ्रा आर्चरच्या यार्करने संपूर्ण मैदानात खळबळ उडवली. आर्चरच्या बॉलिंगवर महेंद्र सिंह धोनी कट अॅन्ड बोल्ड झाला, तरीदेखील त्याला नॉट आऊट ठरवण्यात आलं. क्रिकेटच्या नियमानुसार, बॉल विकेटला लागली आणि त्यावरील विटी पडली नाही तर त्या बॅट्समनला नटआऊट मानलं जातं

जेव्हा बॉल विकेटला लागली त्यावेळी धोनी शुन्यावर खेळतहोता. त्यानंतर त्याने संयमी खेळी करत त्याने ४६ बॉलमध्ये ७५ धावा ठोकून संघाला १७५ धावांचे शिखर गाठून दिले. जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर धोनीला जीवदान मिळाले. म्हणूनच चेन्नईनच्या संघाला हा सामना जिंकता आला. याची राजस्थान रॉयलच्या संघाला खंत वाटतं होती. धोनी हा नेहमी त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत असतो. अशीच उत्तम कामगिरी त्याने रविवारी राजस्थानच्या विरोधात खेळताना दाखवली आहे. तसेच शेवटच्या ओव्हरमध्ये १० धावांची गरज असताना धोनीने बॉल ब्राव्होच्या हातात सोपवला. ब्राव्होच्या आक्रमक बॉलिंगच्या जोरावर चेन्नईच्या संघाला ८ धावांनी विजय मिळवता आला.