Rashid Khan | आम्हाला संकटात सोडू नका, क्रिकेटरची जगाला विनंती

अफगाणिस्तानात वाढत्या तालिबान्यांच्या क्रूरतेमुळे क्रिकेटपटू रशीद खान (Afghanistan cricketer Rashid Khan)  दुखावलाय.

Updated: Aug 11, 2021, 09:40 PM IST
Rashid Khan | आम्हाला संकटात सोडू नका, क्रिकेटरची जगाला विनंती

काबूल : अफगाणिस्तानात वाढत्या तालिबान्यांच्या क्रूरतेमुळे क्रिकेटपटू रशीद खान (Afghanistan cricketer Rashid Khan)  दुखावलाय. रशीदने ट्विट करत अफगाणी लोकांना वाचवावे, असं आवाहन जगातील राजकीय नेत्यांना केलंय. आहेत. त्या ट्विटवर अधिक प्रमाणात नेटीझन्सन कमेंट करत आहेत. तसेच संवेदना व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भारत आणि अमेरिकेसह मोठ्या देशांनी आपल्या लोकांना अफगाणिस्तानातून मायदेशी परतायला सांगितलंय. (Dont leave us in trouble Afghan cricketer Rashid Khan appeal to world political leaders via tweet)

ट्विटमध्ये काय म्हटलंय?
 
"जगभरातील प्रिय नेत्यांनो, माझा देश संकटात आहे. दररोज महिला आणि लहान मुलांसोबत हजारोंना मारलं जातंय. संसारं, संपत्तीचं नुकसान केलं जातंय. लोकांवर घर सोडून जाण्याची वेळ आलीये. या अशा संकटात आम्हाला एकटं सोडू नका.  अफगाणिस्तान आणि येथील लोकांना उद्वस्त होण्यापासून वाचवा. आम्हाला शांतता हवीये, असं ट्विट करत राशिदने आवाहन केलंय.   

भारतीय दूतावासाने मंगळवारी एक पत्रक जारी केलंय. त्यानुसार अफगाणिस्तानात असलेल्या भारतीयांनी लवकर तिथून बाहेर पडावं. तसेच भारतात येण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर प्रवासाचं नियोजन करावं,  असा सल्ला देण्यात आलाय.    

अफगाणिस्तानातील भारतीय कंपन्यांना भारतीय कर्मचाऱ्यांना त्वरित परत पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापूर्वी 29 जून आणि 24 जुलैला देखील भारतीय दूतावासाने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत आपल्या नागरिकांना सल्ला दिला होता.