आयपीएल २०२० : ...तर रॉबिन उथप्पा क्रिस गेललाही टाकेल मागे

 राजस्थान रॉयल आणि दिल्लीच्या सामन्यात उथप्पाच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष

Updated: Oct 14, 2020, 09:23 PM IST
आयपीएल २०२० : ...तर रॉबिन उथप्पा क्रिस गेललाही टाकेल मागे title=

दुबई : आयपीएलमध्ये गुणी खेळाडूंमध्ये मोजला जाणारा रॉबिन उथप्पा एक नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या पहिल्या सिझनची विजेते ठरलेल्या राजस्थान रॉयल आणि दिल्लीच्या सामन्यात उथप्पाच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

दिल्ली विरोधात २३ रन्स बनवल्यावर उथप्पा किंग्ज इलेव्हन पंजाबचा दिग्गज खेळाडू क्रिस गेलला आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्सच्या बाबतीत मागे टाकू शकतो. 

राजस्थान रॉयलचा बॅट्समन रॉबिन उथप्पाने आयपीएलच्या १८२ सामन्यात ४ हजार ४६२ रन्स बनवले. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबचा विस्फोटक फलंदाज क्रिस गेलने आयपीएल करियरमध्ये १२५ सामन्यात ४ हजार ४८४ रन्स बनवले. 

अशावेळी रॉबिनने २३ रन्स बनवल्यास गेलचा रेकॉर्ड तोडू शकतो. तसेच जगातील सर्वात मोठ्या टी २० लीगमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्यांमध्ये ८ व्या स्थानी येऊ शकतो. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स रॉयल चॅलेंजर बॅंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीने बनवलेयत. विराटने आतापर्यंत ५ हजार ६६८ रन्सचा टप्पा गाठलाय. या सिझनमध्ये रॉबिन आपल्या बॅटने कमाल दाखवू शकला नाही. 

रॉबिन उथप्पाने कोलकाता नाईट रायडर्ससाठी बराच काळ आयपीएल खेळली. २०१४ मध्ये उथप्पा लीगचा ऑरेंज कॅप विजेता होता. आयपीएल लीगमध्ये १८२ सामन्यात त्याने ४ हजार ४६२ रन्स केले. त्याचा स्ट्राईक रेट १२९.२४ इतका राहीलाय. १५७ सिक्सर मारुन तो सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत ११ व्या स्थानी आहे. त्यामुळे हा नवा रेकॉर्ड करण्याकडे रॉबिनचे लक्ष असेल.