सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

 सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा खालावली

Updated: Jan 27, 2021, 05:32 PM IST
सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

कोलकाता: बीबीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा खालावली आहे. दादाची तब्येत ढासळताच त्याला कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले.

गांगुलीच्या अचानक छातीत दुखू लागलं आणि त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अपडेट 5 वाजून 30 मिनिटं

सौरव गांगुली नेहमीच्या आरोग्य तपासणीसाठी आल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय. पत्रक जाहीर करुन त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली.