Panchang 14 November 2024 in marathi : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात वैकुंठ चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, वर्षातील हा एक दिवस आहे जेव्हा भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते. मान्यतेनुसार, जो व्यक्ती या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो.
पंचांगानुसार (Panchang Today) आज सिद्धी योग, रवियोग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र मेष राशीत आहे. (Thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित केलं आहे. त्यामुळे विष्णूंचे अवतार श्री स्वामी समर्थ, साईबाबा आणि गजानन महाराज यांची आराधना करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या. (Thursday panchang 14 november 2024 panchang in marathi vaikuntha chaturdashi 2024)
वार - गुरुवार
तिथी - त्रयोदशी - 09:45:26 पर्यंत, चतुर्दशी - 30:21:14 पर्यंत
नक्षत्र - अश्विनी - 24:33:29 पर्यंत
करण - तैतिल - 09:45:26 पर्यंत, गर - 20:03:32 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सिद्वि - 11:29:20 पर्यंत
सूर्योदय - 06:43:17
सूर्यास्त - 17:27:41
चंद्र रास - मेष
चंद्रोदय - 16:10:00
चंद्रास्त - 29:51:00
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:44:23
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक
दुष्टमुहूर्त - 10:18:05 पासुन 11:01:03 पर्यंत, 14:35:51 पासुन 15:18:49 पर्यंत
कुलिक – 10:18:05 पासुन 11:01:03 पर्यंत
कंटक – 14:35:51 पासुन 15:18:49 पर्यंत
राहु काळ – 13:26:02 पासुन 14:46:35 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:01:46 पासुन 16:44:44 पर्यंत
यमघण्ट – 07:26:15 पासुन 08:09:13 पर्यंत
यमगण्ड – 06:43:17 पासुन 08:03:51 पर्यंत
गुलिक काळ – 09:24:23 पासुन 10:44:56 पर्यंत
अभिजीत - 11:44:01 पासुन 12:26:58 पर्यंत
दक्षिण
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)