CBSE पेपर फुटीत अभाविपच्या नेत्याचा हात, काँग्रेसचा आरोप

सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या एका नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केलाय. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय स्वरुप प्राप्त झालेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2018, 08:47 PM IST
CBSE पेपर फुटीत अभाविपच्या नेत्याचा हात, काँग्रेसचा आरोप title=
छाया - ट्विटर

मुंबई : सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या एका नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केलाय. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय स्वरुप प्राप्त झालेय. दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलेय. तर ९ जणांना ताब्यात घेतले आहे.

पेपर फुटीप्रकरणी झारखंड पोलिसांनी तिघांना अटक केली असून ९ जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले संशयित स्टडी व्हिजन नावाच्या खासगी कोचिंग सेंटरशी संबंधित आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेली व्यक्ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ९ अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आलेय. एसआयटीकडून अजूनही तपास सुरू आहे, अशी माहिती छतराच्या पोलीस अधिक्षकांनी माध्यमांना दिला. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेतले आहेत. तर या सर्व प्रकरणात सतीश पांडे याला अटक करण्यात आलेय. तो अभाविपचा पदाधिकारी असल्याचा दावा काँग्रेसने केलाय.

मुलांच्या भवितव्याबरोबर खेळणे हाच अभाविपचे काम आहे. गेल्या अनेक घटनांपासून अभाविपचे हे चित्र आपण पाहत आहोत, असे ट्विट मुंबई काँग्रेस आणि एनएसयूआयने केले आहे. दरम्यान, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. याप्रकरणी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.