सरकारी नोकरी : 'नाबार्ड'मध्ये मेगा भरती, असा करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nabard.org वर जाऊन अर्ज करु शकता. 

Updated: Sep 7, 2018, 11:42 AM IST
सरकारी नोकरी : 'नाबार्ड'मध्ये मेगा भरती, असा करा अर्ज

नवी दिल्ली : नॅशनल बॅंक फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने 63 पदांसाठी भरती सुरू आहे. सिनियर प्रोजोक्ट एडवायजर आणि कम्यूनिकेशन प्रोफेशनल या पदासाठी ही नियुक्ती होत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nabard.org वर जाऊन अर्ज करु शकता.

पदाचे नाव 

सिनियर प्रोजोक्ट एडवायजर, कम्यूनिकेशन प्रोफेशनल

पदांची संख्या- 63 

पात्रता आणि वयोमर्यादा 

या पदासाठी शैक्षणिक आर्हता ठरवून देण्यात आल्या आहेत. एमबीए आणि एमटेक डीग्री असणं यासाठी आवश्यक आहे. उमेदवाराकडे 15 ते 20 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. या क्षेत्रातील चांगली माहिती उमेदवाराला असणं गरजेचं आहे. उमेदवाराचे वय 63 वर्षांपेक्षा अधिक असू नये. निवड झालेल्या उमेदवारांना 2.50 लाखापर्यंत पगार मिळणार आहे.

कसा कराल अर्ज 

www.nabard.org वर लॉग इन करा. यानंतर जॉंब संदर्भातील सर्व माहिती वाचून पुढच्या पानावर जा. 'क्लिक हेअर टू अप्लाय' या लिंकवर क्लिक करा.

नव्या पेजवर 'क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन' ऑप्शनवर क्लिक करा. 

आपला फोटो, डॉक्यूमेंट्स आणि सही स्कॅन करुन येथे अपलोड करा. 

त्यानंतर 'फायनल सबमिट' बटणावर क्लिक करा.यानंतर शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रक्रिया संपेल.