RBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरा करा

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 26, 2017, 01:14 PM IST
RBIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, त्वरा करा title=

नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त असलेल्या पदांवर भरती केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार १० नोव्हेंबर २०१७ पर्यंत आपले अर्ज दाखल करु शकतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या ६२३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी आपला अर्ज सादर करु शकतात.

महत्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक : १० नोव्हेंबर २०१७

ऑनलाईन परीक्षेचा दिनांक (संभाव्य) : २७-२८ नोव्बेंर २०१७

मुख्य परीक्षेचा दिनांक संभाव्य) : २० डिसेंबर २०१७

पदांची संख्या : ६२३

शैक्षणिक पात्रता :

इच्छुक उमेदवाराकडे कमीत कमी ५० टक्क्यांसह कुठल्याही विषयात पदवी असावी. त्यासोबतच कंम्प्युटरचं ज्ञानही आवश्यक आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

अर्ज कसा करावा:

इच्छुक आणि पात्र उमेदवार आपल्या आवश्यक कागदपत्रांसह १० नोव्हेंबर २०१७ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.