भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

Updated: May 31, 2018, 02:06 PM IST
भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती title=
Photo: Reuters

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे. एक नजर टाकूयात कुठल्या पदासाठी आणि किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

पद : HR स्पेशालिस्ट 

एकूण जागा : १

शैक्षणिक पात्रता : MBA सह एचआर / PGDM मध्ये स्पेशलायझेशन तसेच ७ ते १० वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : ३२ ते ३५ वर्षे

नोकरीचं ठिकाण : मुंबई

 

पद : HR स्पेशालिस्ट (Manpower Planning)

एकूण जागा : १

शैक्षणिक पात्रता : MBA सह एचआर / PGDM मध्ये स्पेशलायझेशन तसेच ७ ते १० वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : ३२ ते ३५ वर्षे

नोकरीचं ठिकाण : मुंबई

 

पद : इंटरनल कम्युनिकेशन स्पेशालिस्ट

एकूण जागा : १

शैक्षणिक पात्रता : MBA किंवा मार्केटिंग / मास मीडिया / फायनान्स / कॉमर्स पदव्युत्तर पदवी तसेच ५ ते ९ वर्षांचा अनुभव 

वयोमर्यादा : २७ ते ३५ वर्षे

नोकरीचं ठिकाण : मुंबई

 

पद : बँकिंग सुपरवायझरी स्पेशालिस्ट

एकूण जागा : ३

वयोमर्यादा : ५५ ते ६५ वर्षे

नोकरीचं ठिकाण : मुंबई

 

पद : संरक्षण बँकिंग सल्लागार (आर्मी)

एकूण जागा : १

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त 

वयोमर्यादा : ६२ वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : दिल्ली

 

पद : संरक्षण बँकिंग सल्लागार (Para Military Forces)

एकूण जागा : १

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त 

वयोमर्यादा : ६२ वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : दिल्ली 

 

पद : सर्कल संरक्षण बँकिंग सल्लागार

एकूण जागा : ५

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त (Major General or Brigadier)

वयोमर्यादा : ६० वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई

 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०१८ आहे.

या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/ या संकेतस्थळावर पहायला मिळेल.

अर्ज करण्यासाठी http://ibps.sifyitest.com या लिकंवर क्लिक करा.