घर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा

सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यात घर रंगवण्याचा विचार असेल. तुम्ही जर रंगांच्या माध्यमातून घराला हटके लूक देऊ इच्छित असाल तर, या गोष्टी ध्यानात ठेवा...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 21, 2017, 08:04 PM IST
घर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा title=

मुंबई : सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यात घर रंगवण्याचा विचार असेल. तुम्ही जर रंगांच्या माध्यमातून घराला हटके लूक देऊ इच्छित असाल तर, या गोष्टी ध्यानात ठेवा...

सणांचे वेध लागले की, लोक घर साफ करायला घेतात. मग, घराची रंगरंगोटीही केली जाते. पण, अनेकदा कशा पद्धतीचा रंग द्यायचा याबाबत कन्फ्युजन असते. खरे तर, घराचा रंग आणि तुमचे किंवा कुटुंबाचे व्यक्तिमत्व याचा जवळचा संबंध असतो. पण, हे विचारात न घेतल्यामुळे अनेकांच्या बाबतीत स्वभाव आणि घराचा रंग यांचा विरोधाभास पहायला मिळतो. काही मंडळींना रंगांचे फारसे ज्ञान नसते त्यामुळे ही मंडळी डोळ्याला दिसेल तो रंग निवडतात आणि घर रंगवून काढतात. म्हणून आम्ही देतो या काही टीप्स...

बेडरूम

बेडरूम ही आरामाची खास जागा. खोलीत प्रवेश केला की, मनावरचा ताण हलका व्हायला सुरूवात होते. त्यामुळे अशा वेळी खोलीचा रंग जर मनासारखा असेल तर, त्यातून मिळणारा आनंद काही औरच असतो. बेडरूमसाठी नेहमी पिंक, लाईट ब्लू, क्रीम किंवा लाईट ग्रीन रंगाची निवड करा. याशिवाय आजकाल एच.डी पेंटींगचाही ट्रेंड आहे. जो बेडरूमला हटके लूक देतो. तेव्हा तोही ट्राय करायला हरकत नाही.

डायनिंग रूम

डायनिंग रूमचा रंग निवडताना लक्षात ठेवा की, तुमचा डायनिंग टेबल आणि तुमच्या डायनिंग रूमचा रंग शक्यतो सेम असावा. काहीशी छटा वेगळी असली तरी चालेल. डायनिंग रूम डार्क आणि घरातील इतर रूम जर हलक्या रंगाच्या असतील तर, डायनिंग रूम विशेष उठून दिसतो.

मुलांची खोली

घरात लहान मुले असतील तर, मुलांच्या खोलीलाही त्याच हिशोबाने रंगवा. मुलांच्या खोलीत तुम्ही पिंक किंवा ब्लू रंग देऊ शकता. तसेच भिंतींवर कार्टून, पक्षी, झाडे, डोंगर आदी गोष्टी पेंट करू शकता.

गेस्ट रूम

गेस्ट रूमचा रंग निवडताना नेहमी हलका निवडा. येणाजाणारे पाहूणे वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांना ऑक्वर्ड वाटू नये असा रंग निवडण्याचा प्रयत्न करा. शक्यातो लाईट रंगात सर्वच लोक कंपर्टेबल फिल करतात. ग्रे, लाईट ग्रीन, ब्लू कलर गेस्ट रूमसाठी निवडू शकता.

किचन

घरातील महिलांचा सर्वाधिक वेळ हा किचनमध्ये जात असतो. किचनच्या वापरानुसार एक गोष्ट नक्की असते की, इथे भिंतींवर डाग, ओघळ पडण्याचे चान्सेस अधिक असतात. त्यामुळे किचनसाठी नेहमी डार्क रंग निवडा.... फक्त तो डार्क रंग काळा असून नये....