सोशल मीडियावर घडणाऱ्या एका मिनिटातील करामती

कदाचीत तुम्हाला कल्पना नसेल पण, कोणत्या मिनिटाला सोशल मीडियावर काय घडले. काय घडते याचा डेटा साठवला जातो.

Updated: Jun 30, 2018, 09:46 AM IST
सोशल मीडियावर घडणाऱ्या एका मिनिटातील करामती title=

मुंबई: इंटरनेटशीवाय पानही न हालणाऱ्या, त्यातही सोशल मीडियावर तासनतास पडीक असणाऱ्या नेटकऱ्यांसाठी आजचा दिवस अगदी स्पेशल आहे. कारण, आज आहे सोशल मीडिया डे. इंटरनेटशिवायचे जग ही कल्पनाही आजकाल अनेकांना असहय्य होते. कोणताही काम धंदा न करता सोशल मीडियावर कित्येक तास नियमित खर्ची घालणाऱ्यांना कसे आवरायचे ही एक नवीच समस्या समाजासमोर निर्माण झाली आहे. इंटरनेटच्या मायाजालात गुरफटलेल्या आजच्या जगाला कल्पनाही नसेल की, या जगातून बाहेर पडणे आता अशक्य होत चालले आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, सोशल मीडियावर तुम्ही खर्च केलेल्या मिनिटा मिनिटाचाही हिशोब ठेवला जातो. कदाचीत तुम्हाला कल्पना नसेल पण, कोणत्या मिनिटाला सोशल मीडियावर काय घडले. काय घडते याचा डेटा साठवला जातो. त्याचा अभ्यास केला जातो. म्हणूनच जाणून घ्या सोशल मीडियावर घडणाऱ्या एका मिनिटातील करामती....

लागइन्स

फेसबुकवर प्रतिमिनिट तब्बल ४ अरब २०३ कोटी ३६ लाख (४,२०३,३६,००,०००) फेसबुक लॉगइन्स होतात.

गुगल सर्च

एका मिनिटात गुगलवर चक्क १५ अरब ९८४ कोटी (१५,९८४,००,००,०००) सर्च होतात. यालाच गुगल सर्च असेही म्हणतात.

व्हाट्सअॅप मेसेज 

प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या व्हाट्सअॅपवर एका मिनिटात १६४ अरब १६० कोटी (१६४,१६०,००,००, ०००) मेसेज पाठवले जातात.

ईमेल्स

एका मिनिटात चक्क ८०७ अरब, ८४० कोटी (८०७,८४०,००,००,००० ) इमेल्स पाठवले जातात. 

इंटरनेटवर एका मिनिटात घडणाऱ्या आणखी काही मजेशीर गोष्टी

  • टेक्स्ट मेसेजची संख्या प्रती मिनिट १.८ कोटी
  • युट्यूबवर पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओंची संख्या प्रति मिनिट ४३ लाख
  • इन्स्टाग्राम स्क्रोलची प्रतिमिनिट संख्या १ लाख ७४ हजार
  • ट्विटरवर होणाऱ्या ट्विट्सची संख्या प्रतिमिनिट ४ लाख ८१ हजार
  • टिंडर स्वॅपची संख्या प्रतिमिनिट १.१ कोटी 
  • ट्विट पाहिले जाण्याची संख्या प्रति मिनिट ९ लाख ३६ हजार 

( * सोशल मीडियामध्ये चालणाऱ्या घडामोडींची अकडेवारी ही क्षणाक्षणाला सातत्याने बदलत असते. त्यामुळे प्रत्येक वेळी आकडेवारीत बदल जाणवतो. तरीही जास्तीत जास्त अचूक आकडेवारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही त्यात बदल संभवतो.)