मुंबई : आज 1 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाला. पण निकाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी संकेतस्थळ उघडल्याने साईट क्रॅश झाली आहे. वेबसाईट क्रॅन झाल्याने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत. अजूनही साईट (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) पूर्ववत झालेली नाही.
दहावीच्या निकालासाठीची वेबसाईट पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. संकेतस्थळ लवकरच पूर्ववत होऊन विद्यार्थ्यांना निकाल बघता येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.
आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. पण अनेकांना अजूनही निकाल पाहता आलेला नाही. दरवर्षीपेक्षा यंदा पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत.