वायुदलात निवड झाली पण... विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा फटका टॉपर्संना बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Updated: Aug 11, 2017, 07:05 PM IST
वायुदलात निवड झाली पण... विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा फटका टॉपर्संना बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मुंबई विद्यापीठातील अनेक नामांकित कॉलेजेसमधील टॉपर्स नापास झाले आहेत. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबई विद्यापीठाने टीवाय बीएससीचे निकाल जाहीर केले. पण निकालात घोळच घोळच घोळ असल्याचे समोर आलंय. 

माटुंग्यातील खालसा कॉलेजमध्ये तर टॉपर विद्यार्थ्याला एका विषयात फक्त १३ मार्क देण्यात आलेत. याविषयी खालसा कॉलेजकडून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार करण्यात आलीय. 

तर माहीम येथिल रुपारेल कॉलेजमधील क्षितिज जोशी या विद्यार्थ्याला देखील टीवायबीएससी पाचव्या सेमिस्टरमध्ये नापास दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे क्षितिजची निवड भारतीय वायुदलात झालीय. त्याने नुकतीच त्यासाठीची स्पर्धा परीक्षा पास केलीय. त्यालाही १४ मार्क देवून एका विषयात नापास करण्यात आलंय. 

यासंदर्भात कॉलेजने विद्यापीठाला पत्र पाठवलं आहे. पण अद्याप विद्यापीठाने हा प्रश्न सोडवला नाही तर विलेपार्ले येथिल मिठीबाई कॉलेजमधील अर्जुन विद्यार्थी जो कॉलेजमधील सर्व सेमिस्टरमध्ये टॉपर आहे त्यालाही एका विषयात नापास करण्यात आले आहे.