close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हॅलेंटाईन २०१८: पार्टनरसोबतच या लोकांनाही ठेवा ध्यानात

 खरे विशेष तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरसोबतच या व्यक्तिलाही खास ध्यानात ठेवता. खास करून व्हॅलेंटाईन डे तुम्ही त्यांच्यासोबत साजरा करता. जे तुमच्या आनंदसाठी सदैवर कार्यशील असतात. कोण आहेत हे लोक घ्या जाणून.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 10, 2018, 12:53 PM IST
व्हॅलेंटाईन २०१८: पार्टनरसोबतच या लोकांनाही ठेवा ध्यानात

मुंबई : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमिकांचा जणून उत्सवच. अशा उत्सवाच्या क्षणी आपल्या पार्टनरला काय भेट द्यायची किंवा हा दिवस कसा साजरा करायचा हा विचार तुम्ही नक्कच करत असाल. पण, त्यात विशेष असे काही नाही. खरे विशेष तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरसोबतच या व्यक्तिलाही खास ध्यानात ठेवता. खास करून व्हॅलेंटाईन डे तुम्ही त्यांच्यासोबत साजरा करता. जे तुमच्या आनंदसाठी सदैवर कार्यशील असतात. कोण आहेत हे लोक घ्या जाणून.

आईसाठी खास आठवण 

व्हॅलेंटाईन डेला तुम्ही पार्टनरसोबत धमाल कराच. पण, त्यासोबत आईलाही ध्यानात ठेवा. या दिवशी तिला काहीतरी खास गिफ्ट द्या. तुम्ही तिला डिनरसाठी बाहेरही घेऊन जाऊ शकता. तिच्यासाठी तुम्ही एखादी खास डिश बनवली तरीसुद्धा तिला आनंद होईल. 

कुटुंबियांसाठी खास वेळ द्या...

आपल्या यशापयशात आपल्या कुटुंबियांची प्रचंड महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे व्हॅलेंटाईनसारख्या खास दिवशी त्यांना विशेष वेळ द्या. हा वेळ देताना १०० टक्के द्यायचा प्रयत्न करा. अगदी तुमचे ऑफीस, फोन, मित्र, कामे आदी गोष्टी कटाक्षाने दूर ठेवा. असे कल्याने तुमच्याप्रती कुटुंबियांच्या मनात अधिक प्रेम निर्माण होईल.

चांगल्या दोस्तांसोबत साजरा करा क्षण

नाती ही आपल्याला ठरवता येत नाहीत. ती आपल्या जन्मानंतर नैसर्गिकरित्या आपल्याला मिळतात. पण, मैत्री हे असे नाते आहे, जे तुम्ही स्वत:हून निवडतात. त्यामुळे माणसांच्या बाबतीत आपण किती चोखंदळ असतो हे वेगळे सांगायलाच नको. अशा निवडक माणसांसोबत साजरा करण्साठी व्हॅलेंटाईनसारखा दुसरा क्षण तो कोणता?

गरजूंना मदत करा

मदत हेसुद्धा एक सुंदर गिफ्ट आहे. गरज नसलेलल्यांसाठी वेळ घालवण्यापेक्षा गरजूंना मदत देण्यात एक वेगळा आनंद आहे. एखाद्या गरजूला वेळेवर मदत करणे म्हणजे तुमच्याकडून त्याला मिळालेली ती सर्वोच्च भेट असते. या भेटीचा मोबदला तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरील आनंदात पहायला मिळेन.